Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
June 21, 2025
in बातमी, राजकीय, विशेष
0
Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर
       

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेते, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. या मागणीला आगरी आणि कोळी समाजासोबतच वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीही पाठिंबा दिला होता आणि आता पुन्हा एकदा या मागणीसाठी लढा उभारण्यात येत आहे. (Dinkar Balu Patil)

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत x (twitter) हॅण्डलवर ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात काल आगरी-कोळी समूहाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली.

त्यांनी केंद्रीय स्तरावर या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मागील सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, सध्याच्या सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली आहे. (Dinkar Balu Patil)

रायगड जिल्ह्यातील उलवे, कोपर, पनवेल पट्ट्यातील मूळ रहिवासी आणि भूमिपुत्र असलेल्या आगरी आणि कोळी बांधवांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी दि. बा. पाटील यांनी बहुमोल योगदान दिले असून, त्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले होते. ते ओबीसींच्या जागृती आणि हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे एक लढाऊ नेते होते, असे ते म्हणाले. (Dinkar Balu Patil)

वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की, जर सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही, तर आगरी आणि कोळी बांधवांसह वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. असा इशारा त्यांनी दिला आहे.


       
Tags: mumbaiPrakash Ambedkarvbaforindia
Previous Post

कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!

Next Post

IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

Next Post
IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा ; ॲड. प्रकाश आंबेडकर

IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा - प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
स्टार बॉक्सर निखत जरीनने वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये गोल्ड मेडल जिंकले!
बातमी

स्टार बॉक्सर निखत जरीनने वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये गोल्ड मेडल जिंकले!

by mosami kewat
November 21, 2025
0

भारताची स्टार बॉक्सर आणि दोन वेळा विश्वविजेती असणारी निखत जरीन हिने बॉक्सिंग मध्ये शानदार पुनरागमन करत वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स...

Read moreDetails
बांधकाम कामगार श्रमिक सेना ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये!

बांधकाम कामगार श्रमिक सेना ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये!

November 20, 2025
संविधान सन्मान महासभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भारतीय बौद्ध महासभा

संविधान सन्मान महासभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भारतीय बौद्ध महासभा

November 20, 2025
प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा

प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा

November 20, 2025
नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू - वंचित बहुजन आघाडी

नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू – वंचित बहुजन आघाडी

November 20, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home