Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

mosami kewat by mosami kewat
February 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका
       

औरंगाबाद : राज्यभर गाजत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी पोलीस विभाग आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सरकारची न्यायालयाचे आदेश पाळण्याची इच्छाच दिसत नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. (Somnath suryawanshi murder case)

कायद्यातील त्रुटींवर ठेवले बोट प्रकाश

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात दोन प्रमुख मुद्दे मांडले. भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १९६ (कलम १७६ चे सुधारित संदर्भ) नुसार कोठडीतील मृत्यूची चौकशी अनैसर्गिक म्हणून केली जाते, पण त्यानंतर दोषींवर काय कारवाई करायची, याबाबत कायदा मौन असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. केंद्र आणि राज्य सरकारने या संदर्भात अद्याप कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

गृहमंत्र्यांनाच न्यायालयात पाचारण करा

आंबेडकर पुढे म्हणाले की, न्यायालयात हजर होणाऱ्या अधिकाऱ्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. त्यामुळे जर हा कायदेशीर पेच सोडवायचा असेल, तर न्यायालयाने थेट संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बोलावून ‘अपुरा कायदा कधी पूर्ण करणार?’ असा सवाल विचारला पाहिजे. (Somnath suryawanshi murder case )

सरकारला आणखी एक संधी द्यायची असेल तर ती गृहमंत्र्यांच्या उपस्थितीतच द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची गंभीरता पाहता, न्यायालयाने उद्या (गुरुवारी) या केसची सुनावणी प्रथम क्रमांकावर ठेवली आहे. उद्याच्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


       
Tags: aurangabadAurangabad newscmDevendra FadanvisElectionFIRMaharashtraMaharashtra cmpolicePoliticalpolticsSomnath Suryawanshi murder case
Previous Post

चेंबूरमध्ये बिल्डर सुशील रहेजाकडून बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

प्रस्थापितांच्या लूटमारीला रोखण्यासाठी वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात पाठवा! – सुजात आंबेडकर

Next Post
प्रस्थापितांच्या लूटमारीला रोखण्यासाठी वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात पाठवा! – सुजात आंबेडकर

प्रस्थापितांच्या लूटमारीला रोखण्यासाठी वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात पाठवा! – सुजात आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
बातमी

जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात

by mosami kewat
March 16, 2026
0

मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित...

Read moreDetails
गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

March 16, 2026
पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

March 16, 2026
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

March 16, 2026
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home