Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भाजप-आरएसएसच्या ओबीसींबद्दल असणाऱ्या दुटप्पी धोरणावर प्रकाश आंबेडकरांनी ओढले ताशेरे !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 21, 2023
in बातमी, राजकीय
0
भाजप-आरएसएसच्या ओबीसींबद्दल असणाऱ्या दुटप्पी धोरणावर प्रकाश आंबेडकरांनी ओढले ताशेरे !
       

हे कसले ओबीसी प्रेम?

मुंबई – भाजप ओबीसींना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतेय पण, ओबीसींना मंडल कमिशनद्वारे २७ टक्के आरक्षण लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान वी.पी. सिंग यांचा जयघोष करायला ते का तयार नाहीत? हे आश्चर्यकारक आहे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत भाजपा-आरएसएसवर हल्लाबोल केला.

पुढे ते म्हणाले की, माजी पंतप्रधान वी.पी. सिंगांनी भाजपला आजार म्हटले होते म्हणून ते असं करीत आहेत का? की भाजप देशाच्या स्थैऱ्याला सर्वात मोठा धोका आहे असं म्हटलं म्हणून? की वी. पी. सिंगांच्या कार्यकाळात आडवाणी आणि त्यांच्या गुंडांना अडवून अटक करण्यात आली होती म्हणून भाजपा त्यांचा उल्लेख टाळते आहे असा रोकडा सवाल ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला विचारला आहे.

पुढे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ओबीसींना आवाहन करत असे म्हटले आहे की, “माझ्या ओबीसी बंधू आणि भगिनींनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारा की मंडल कमिशनमुळे ओबीसींना झालेला तीन दशकांचा लाभ खाजगीकरण आणि आरक्षणाशी खेळ करून भाजप-आरएसएस धुळीस का मिळवत आहे? ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला भाजप-आरएसएस एवढी का घाबरते? एवढा विरोध का करते? भाजप-आरएसएसला ओबीसींना राजकीय आरक्षण का द्यायचे नाही? हे कसलं ओबीसी प्रेम आहे? ट्विटरवर असे थेट आणि बोचणारे प्रश्न विचारून त्यांनी भाजपा-आरएसएसवर हल्लाबोल केला.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विट मुळे भाजपची गोची झाल्याचे बोलले जात असून यावर भाजप कडून काय उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर मात्र ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विट मुळे भाजपच्या ओबीसी धोरणावर टीका होताना दिसत आहे.

ट्विट लिंक –

It’s puzzling that the BJP is trying to woo #OBCs but not celebrating former PM V.P. Singh, who implemented the Mandal Commission recommendation of 27 percent reservation for the OBCs.

Is it because VP Singh called BJP a disease?
Is it because VP Singh called BJP the biggest… pic.twitter.com/jnkQLQg3pv

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 21, 2023

       
Tags: bjpobcPrakash AmbedkarrssV P Singh
Previous Post

आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल !

Next Post

प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी घेतले राजराजेश्वराचे दर्शन

Next Post
प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी घेतले राजराजेश्वराचे दर्शन

प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी घेतले राजराजेश्वराचे दर्शन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इतिहास घडवला! भारतीय महिला ब्लाइंड टीम पहिल्या वर्ल्ड कपची मानकरी, फायनलमध्ये नेपाळवर ७ विकेट्सने विजय!
क्रीडा

इतिहास घडवला! भारतीय महिला ब्लाइंड टीम पहिल्या वर्ल्ड कपची मानकरी, फायनलमध्ये नेपाळवर ७ विकेट्सने विजय!

by mosami kewat
November 23, 2025
0

कोलंबो: भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला आहे! कोलंबोमध्ये झालेल्या रोमांचक फायनलमध्ये आपल्या दमदार खेळाच्या बळावर भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाने...

Read moreDetails
बिनविरोधी निवडणुका करणे लोकशाहीला धोका : सुजात आंबेडकर

बिनविरोधी निवडणुका करणे लोकशाहीला धोका : सुजात आंबेडकर

November 23, 2025
पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; वंचित बहुजन युवक आघाडीने घेतल्या हरकती

पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; वंचित बहुजन युवक आघाडीने घेतल्या हरकती

November 22, 2025
Mumbai : अभिनेता गौरव मोरे यांना संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण

Mumbai : अभिनेता गौरव मोरे यांना संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण

November 22, 2025
कापूरवाडीत महार वतनाच्या जागेवर अवैध उत्खनन; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

कापूरवाडीत महार वतनाच्या जागेवर अवैध उत्खनन; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

November 22, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home