पंढरपूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आज पंढरपूर येथील न्यायालयात हजर झाले. कोविड काळात केलेल्या आंदोलनामुळे पंढरपूर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते.
याच प्रकरणी ते कोर्टात हजर झाले असता, पंढरपूर बार असोसिएशनने त्यांचे स्वागत केले. यावेळी आंबेडकर यांनी कोर्टातील वकिलांशी संवाद साधला. तसेच त्यांनी विविध कायदेशीर बाबींवर चर्चा केली.