Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथील घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 5, 2024
in बातमी
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथील घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त !
       

उस्मानाबाद भुम येथे रक्षकचं झाले भक्षक !

उस्मानाबाद : ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ हे ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस खात्यातील पोलीस आणि होमगार्ड यांचे अत्यंत घृणास्पद कृत्य समोर आले आहे. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा या छोट्याश्या गावात राहणारी पारधी समाजाच्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना भुम तालुक्यात घडली आहे.

यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भूम जि. उस्मानाबाद येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका पारधी समाजाच्या महिलेवर २ पोलिसांनी अत्याचार केलाय. त्यातील १ आरोपी होमगार्ड, तर दुसरा पोलीस शिपाई आहे.

पीडित महिला ऊसतोड मजूर असून ती तिच्या मुलांना भेटायला बार्शी येथे जात असतांना बस स्टँडवर आरोपींनी पीडित आणि तिचा दिर थांबले असतांना त्यांना ‘चोर’ असल्याच्या संशयावरून गाडीत बसवून नेले आणि पैशांची मागणी केली. पीडित महिलेने ऊसतोड मुकादमाकडून उसने पैसे घेऊन आरोपी पोलिसांच्या मोबाईलवर पैसे दिले.यानंतर पुन्हा आरोपी पोलिसाने महिलेला दमदाटी करून महिलेवर अत्याचार केला आणि पीडितेला धमकावले. या घटनेवरून राज्याच्या कायद्या आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय. एकीकडे खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, तर दुसरीकडे कायद्याचे रक्षकच भक्षक होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

या सर्व प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पीडित महिलेची भेट घेऊन त्यांना धीर दिला. ‘वंचित’चे नेते ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी हे प्रकरण लावून धरले.प्रशासन आणि सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका सामान्य जनतेला बसतोय. गृहमंत्र्यांचे हे सपशेल अपयश आहे. आरोपींना कठोर शिक्षा केली जावी. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर होत चाललाय, हे स्पष्ट होत असल्याचे मत आंबेडकरांनी व्यक्त केले.

पिडीत महिलेने घडलेला प्रकार ऊसतोड मुकादम आणि तिच्या वडिलांना सांगितला. पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी दगडू सुदाम भुरके पोलीस ठाणे, भुम व सागर चंद्रकांत माने. रा. भुम जिल्हा उस्मानाबाद या दोघांविरुद्ध भुम पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पीडितेला ॲड.डॉ.अरुण जाधव आणि विशाल पवार यांनी मदत केली. या पीडितेला मदत करण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत.


       
Tags: Arun JadhavPrakash AmbedkarusmanabadVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ च्या कार्यकर्त्याने पक्ष कार्यालयासाठी दिले स्वतःचे घर !

Next Post

मुस्लीम समाजावर दाखल गुन्हे माघार घ्यावेत – इम्तियाज नदाफ

Next Post
मुस्लीम समाजावर दाखल गुन्हे माघार घ्यावेत – इम्तियाज नदाफ

मुस्लीम समाजावर दाखल गुन्हे माघार घ्यावेत - इम्तियाज नदाफ

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवर उपस्थित राहणार
बातमी

मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवर उपस्थित राहणार

by mosami kewat
November 25, 2025
0

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक शेवटच्या भाषणानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज “संविधान सन्मान महासभा”...

Read moreDetails
मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; संविधानप्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; संविधानप्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

November 25, 2025
मुंबईत वंचितच्या ‘संविधान सन्मान महासभे’ची जय्यत तयारी; युवा नेते सुजात आंबेडकरांकडून तयारीचा आढावा

मुंबईत वंचितच्या ‘संविधान सन्मान महासभे’ची जय्यत तयारी; युवा नेते सुजात आंबेडकरांकडून तयारीचा आढावा

November 24, 2025
संविधान सन्मान महासभेला उद्या उसळणार जनसागर! संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

संविधान सन्मान महासभेला उद्या उसळणार जनसागर! संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

November 24, 2025
बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’चा अस्त: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; दिग्गजांनी दिला अखेरचा निरोप

बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’चा अस्त: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; दिग्गजांनी दिला अखेरचा निरोप

November 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home