Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ओबीसी आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या विजय बोचरे यांच्या कुटुंबाची बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट

mosami kewat by mosami kewat
October 11, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ओबीसी आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या विजय बोचरे यांच्या कुटुंबाची बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट

ओबीसी आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या विजय बोचरे यांच्या कुटुंबाची बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून शासनाच्या निर्णयामुळे प्रचंड धक्का बसल्याने, ओबीसी समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि ओबीसी योद्धा म्हणून ओळखले जाणारे विजय बोचरे यांनी दि. ९ ऑक्टोबर रोजी आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे ओबीसी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (prakash ambedkar)

विजय बोचरे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात त्यांना धीर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकर यांनी बोचरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

यावेळी आंबेडकर दांपत्याने बोचरे कुटुंबाचे सांत्वन केले आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणासाठी आपण सदैव ओबीसी बांधवांसोबत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. (prakash ambedkar)

ओबीसी बांधवांना आवाहन :

विजय बोचरे यांच्या बलिदानानंतर वंचित बहुजन आघाडीने ओबीसी बांधवांना तीव्र शब्दांत जागे होण्याचे आवाहन केले आहे. “ओबीसी बांधवांनो जागे व्हा! आम्ही आमचा एक बांधव गमावला आहे, अजून किती वाट पाहताय?” असा सवाल उपस्थित करत, या निबरगट शासनाला जागे करण्यासाठी आता लढा देणे अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे. (prakash ambedkar)

“आमच्या न्याय आणि हक्कासाठी आम्हाला लढावेच लागेल. सर्व ओबीसी बांधवांनी जागे व्हा. आमचे जीवन एवढे स्वस्त आहे का?” असे आवाहनही वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.

Tags: Anjali AmbedkarCasteMaharashtramumbaiobcPrakash AmbedkarreservationVanchit Bahujan Aaghadivbaforindiavijay bochare
Previous Post

व्हेनेझुएलातील लोकशाहीवादी नेत्या मारिया कोरिना माचाडो यांना नोबेल; हुकूमशाहीविरुद्धच्या लढ्यासाठी सन्मान

Next Post

सोन्याला आलेली झळाळी ; जागतिक अर्थव्यवस्था नजिकच्या काळात झाकोळलेली ?

Next Post
सोन्याला आलेली झळाळी = जागतिक अर्थव्यवस्था नजिकच्या काळात झाकोळलेली ?

सोन्याला आलेली झळाळी ; जागतिक अर्थव्यवस्था नजिकच्या काळात झाकोळलेली ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुत्तकींच्या भारत भेटीत वादाची ठिणगी: पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला; 'लैंगिक वंशभेदा'चा मुद्दा ऐरणीवर
बातमी

मुत्तकींच्या भारत भेटीत वादाची ठिणगी: पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला; ‘लैंगिक वंशभेदा’चा मुद्दा ऐरणीवर

by mosami kewat
October 11, 2025
0

नवी दिल्ली : तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी एका आठवड्याच्या दौऱ्यासाठी गुरुवारी भारतात दाखल झाले. ऑगस्ट २०२१ मध्ये...

Read moreDetails
सोन्याला आलेली झळाळी = जागतिक अर्थव्यवस्था नजिकच्या काळात झाकोळलेली ?

सोन्याला आलेली झळाळी ; जागतिक अर्थव्यवस्था नजिकच्या काळात झाकोळलेली ?

October 11, 2025
ओबीसी आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या विजय बोचरे यांच्या कुटुंबाची बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट

ओबीसी आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या विजय बोचरे यांच्या कुटुंबाची बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट

October 11, 2025
व्हेनेझुएलातील लोकशाहीवादी नेत्या मारिया कोरिना माचाडो यांना नोबेल; हुकूमशाहीविरुद्धच्या लढ्यासाठी सन्मान

व्हेनेझुएलातील लोकशाहीवादी नेत्या मारिया कोरिना माचाडो यांना नोबेल; हुकूमशाहीविरुद्धच्या लढ्यासाठी सन्मान

October 11, 2025
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!

ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!

October 10, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home