कर्नाटक : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर कर्नाटकात अनुसूचित जातींच्या (SC) संदर्भात बनावट सर्वेक्षण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आंबेडकर यांनी समाजमाध्यमांवर x (ट्विटर) राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना टॅग करत, काँग्रेसवर अनुसूचित जातींना फसवण्याचा कट रचल्याचा प्रश्न विचारला आहे. त्यांनी थेट राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांना उद्देशून विचारले की, तुम्ही अनुसूचित जातींना फसवण्याचा कट का करत आहात?
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, काँग्रेस कर्नाटकात अनुसूचित जातींसाठी एक बनावट सर्वेक्षण करत आहे! निवासी लोकांशी न बोलता किंवा कोणतीही माहिती न गोळा करता, घरांवर गुप्तपणे नोटिसा चिकटवून कोणते कायदेशीर सर्वेक्षण केले जाते?
या संदर्भातील फोटो सुद्धा पोस्ट केले आहेत. त्यांनी पुढे विचारले आहे की, अशा खोट्या सर्वेक्षणांचा काय उपयोग होईल? आंबेडकर यांनी या ‘बनावट सर्वेक्षणा’मागे काँग्रेसचा कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की,
अनुसूचित जातींचा चुकीचा आणि खोटा डेटा नोंदवून, सरकारी क्षेत्रात आणि कल्याणकारी अंदाजपत्रकात त्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा काँग्रेसचा कट आहे का?
या आरोपांमुळे कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, काँग्रेसकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटमुळे अनुसूचित जातींच्या हितासंबंधीच्या सर्वेक्षणांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा आहे
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात "जातीय...
Read moreDetails