अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अकोल्याच्या प्रगती सुनील जगताप हिचा प्रगतीचा बौद्ध महासभेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा आणि प्रबुद्ध भारत यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम अशोक वाटिका येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पी. जे. वानखडे सर होते. मंचावर जिल्हा सरचिटणीस नंदकुमार डोंगरे, जेष्ठ संघटक रमेश गवई गुरुजी, महिला जिल्हाध्यक्षा इंदु मेश्राम, तसेच प्रबुद्ध भारतचे भगवान उमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विपरीत परिस्थितीतून घवघवीत यशचैतन्यनगर व अशोकनगरसारख्या अत्यंत साध्या आणि प्रतिकूल परिस्थितीत वाढूनदेखील प्रगतीने कठोर परिश्रम, सातत्य, जिद्द आणि अभ्यासातील चिकाटी यांच्या बळावर राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवत अकोल्याचा गौरव वाढवला. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजातील युवा विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.
‘प्रशासनापेक्षा समाजभान महत्त्वाचे’ — वानखडे सर
या सत्कारावेळी बोलताना पी. जे. वानखडे सर यांनी प्रगतीच्या यशाचे कौतुक करताना म्हटले की, “प्रगती सारखे अधिकारी प्रशासनासोबत सामाजिक विकासाचे भान ठेवून काम करतील, तर समाजाची प्रगती रोखू शकणारा कुणीच नाही. अकोल्याच्या शिरपेचात हा मानाचा मुकुट आहे.”
कार्यक्रमात मोठी उपस्थिती-
या सत्कार सोहळ्याला प्रगतीचे कुटुंबीय – वैशाली सुनील जगताप, रोहित सुनील जगताप, यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यात राहुल गोटे (प्रचार प्रसार सचिव), विशाल बावस्कर, पी. जे. शेगावकर, गोरखनाथ वानखडे, प्रकाश बागडे, प्रदिप सिरसाट, विजय नरवाडे, डॉ. प्रफुल्ल वानखडे, किशोर तेलगोटे, प्रकाश प्रधान, मुकुंदराव गायकवाड, भूषण कांबळे आदींचा समावेश होता.
सुत्रसंचालन व आभारकार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस नंदकुमार डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक इंदु मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन रमेश गवई गुरुजी यांनी केले.





