Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याने विशाल दहाटचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार

mosami kewat by mosami kewat
September 15, 2025
in बातमी
0
विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याने विशाल दहाटचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार

विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याने विशाल दहाटचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार

‎
‎गरीबीवर मात करून विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याने सागर भवते यांनी केले सन्मानित
‎
‎अमरावती : तिवसा तालुक्यातील उंबरखेड येथील अत्यंत गरीब कुटुंबातील युवक विशाल दहाट याची विद्युत सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या हस्ते विशालचा त्याच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला.
‎
‎अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही विशालने हार मानली नाही. त्याने शेतमजुरीची कामे करत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्याच्या याच कठोर परिश्रमामुळे अखेर त्याचे नाव विद्युत सहाय्यकच्या निवड यादीत झळकले आहे. त्याच्या या यशामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
‎
‎वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विशालच्या उंबरखेड येथील घरी जाऊन त्याचा सत्कार केला. यावेळी जिल्हा महासचिव सागर भवते यांनी विशालला शाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषणे खंड पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
‎
‎याप्रसंगी बोलताना सागर भवते म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांनी निराश न होता कठोर मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास बाळगल्यास यश नक्कीच मिळते. विशालच्या निवडीने हा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे. तर विशालने आपल्या यशाचे श्रेय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिले.
‎
‎या सत्कार सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य बबलू मुंद्रे, माजी तालुका उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र दवाळे, निलेश सोनोने, सागर गोपाळे, राहुल गोपाळे, नंदू मुंद्रे, आकाश मुंद्रे, भारतीय बौद्ध महासभेचे भारत दहाट, विनोद खाकसे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या रुपाली मुंद्रे, वृषाली गोपाळे, सरिता दहाट यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: ITI TrainingVanchit Bahujan Aghadiअमरावती
Previous Post

‎आपल्या दुःखाचे कारण शोधल्यासच दुःखमुक्ती – अॅड. एस. के. भंडारे

Next Post

वंचित बहुजन युवा आघाडीच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद

Next Post
वंचित बहुजन युवा आघाडीच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद

वंचित बहुजन युवा आघाडीच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सुजात आंबेडकरांचा मुंबईत ‘ठाकरें’वर तुफानी हल्ला; मराठी अस्मितेचा केवळ जुमला, यांचा जातीवाद विसरू नका!
बातमी

सुजात आंबेडकरांचा मुंबईत ‘ठाकरें’वर तुफानी हल्ला; मराठी अस्मितेचा केवळ जुमला, यांचा जातीवाद विसरू नका!

by mosami kewat
January 13, 2026
0

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मुंबई दौऱ्यात शिवसेना (उबाठा) आणि राज...

Read moreDetails
अकोल्यात वंचितचा एल्गार! जनसामान्यांचा प्रचंड गर्दी आता परिवर्तनाची वेळ आलीय – प्रभाग ७ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडली

अकोल्यात वंचितचा एल्गार! जनसामान्यांचा प्रचंड गर्दी आता परिवर्तनाची वेळ आलीय – प्रभाग ७ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडली

January 13, 2026
वंचित बहुजन आघाडीची अकोल्यात ‘संवाद बैठक’; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला भीमनगरवासीयांशी संवाद

वंचित बहुजन आघाडीची अकोल्यात ‘संवाद बैठक’; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला भीमनगरवासीयांशी संवाद

January 13, 2026
शहरांच्या मूलभूत विकासासाठी एक संधी वंचितला द्या!

शहरांच्या मूलभूत विकासासाठी एक संधी वंचितला द्या!

January 13, 2026
एसी, एस, टी, आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा, आरक्षण मोडीत काढण्याचा न्यायालयीन कट उघड! 

एसी, एस, टी, आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा, आरक्षण मोडीत काढण्याचा न्यायालयीन कट उघड! 

January 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home