Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गरीब मराठे व ओबीसींनी मतदान करतांना विचार करा – प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई
       

अमरावती – राज्यातील श्रीमंत व विशेषत: सत्ताधारी मराठे गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी नकारात्मक आहे. राज्यकर्ते मराठे गरीब मराठ्यांनाच स्वीकारत नाही, मग ओबीसी तर त्यांच्या नात्यागोत्याचे किंवा रक्ताचेही नाही. त्यामुळे आता गरीब मराठे व ओबीसींनीही अशा राज्यकर्त्यांना मतदान करावे की नाही, याबाबत विचार केला पाहिजे, असे परखड मत वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

पक्षाच्या शिबिराच्या अनुषंगाने अ‍ॅड. आंबेडकर अमरावतीच्या दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ते म्हणतात, राज्य घटनेप्रमाणे वागायचे नाही, असेच चित्र सध्या देशात आहे. राज्यघटनेनुसार लोकप्रतिनिधींच्या सभागृहाशिवाय प्रशासन कारभार करू शकत नाही; मात्र तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाने वेळेवर घेतल्या नाही. सर्वोच्च न्यायालयानेही तत्काळ निवडणुका घ्या, असे स्पष्ट आदेश दिले नाही. घटनेच्या चौकटीला ते धरून नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

खरंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ज्या प्रमाणे या देशात मंदिर, मशीद किंवा कुठलीही इमारत होती ती तशीच पुढे जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, चारशे वर्षांपूर्वी याठिकाणी असं होतं, असे विषय सुरू करण्यात कुठलाही अर्थ नाही. असेच जर करायचे असेल तर उद्या जगाने आपल्याला अशोकाच्या काळात भारतात काय होते असे विचारले तर अशोकाच्या काळात असणारा भारत आता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार का? खरंतर हे सर्व अशक्य आहे आणि अशा चुकीच्या विषयांकडे समाजाला वळविणे योग्य नाही. जुने वाद उकरून काढण्यासाठी केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्था नाही. न्यायव्यवस्थेने आणि केंद्राने आपल्या मर्यादेत राहावे, असा इशारा देखील अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिला.


       
Tags: MaharashtraPrakash Ambedkar
Previous Post

वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणूका सर्व ताकदीने लढवणार – प्रा. किसन चव्हान

Next Post

समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन ऍमेझॉनवर बेस्ट सेलर !

Next Post
समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन ऍमेझॉनवर बेस्ट सेलर !

समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन ऍमेझॉनवर बेस्ट सेलर !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन युवा आघाडीच्या लढ्याला मोठे यश; शीतल मोरे मृत्यू प्रकरणातील चौकशीला वेग
बातमी

वंचित बहुजन युवा आघाडीच्या लढ्याला मोठे यश; शीतल मोरे मृत्यू प्रकरणातील चौकशीला वेग

by mosami kewat
January 21, 2026
0

नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिझर दरम्यान मृत्यू झालेल्या शीतल मोरे यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना शिक्षा व्हावी, यासाठी वंचित बहुजन आघाडी...

Read moreDetails
पुणे जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी साथ साथ, ७३ जागांवर एकत्रित लढत !

पुणे जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी साथ साथ, ७३ जागांवर एकत्रित लढत !

January 21, 2026
जातीय द्वेषातून भोगगावात बौद्ध शेतकऱ्यांची ४० एकर ऊस शेती जाळली; वंचित बहुजन आघाडीची घटनास्थळी पाहणी!

जातीय द्वेषातून भोगगावात बौद्ध शेतकऱ्यांची ४० एकर ऊस शेती जाळली; वंचित बहुजन आघाडीची घटनास्थळी पाहणी!

January 20, 2026
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!

January 20, 2026
समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे – डॉ. हर्षदीप कांबळे 

समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे – डॉ. हर्षदीप कांबळे 

January 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home