Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रा. किसन चव्हाण यांना दंगलीत अडकवण्याचा पोलिसांचा चेहरा उघड; शेवगावचे तत्कालीनपीआय विलास पुजारीच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 18, 2025
in बातमी, मुख्य पान, राजकीय
0
प्रा. किसन चव्हाण यांना दंगलीत अडकवण्याचा पोलिसांचा चेहरा उघड; शेवगावचे तत्कालीन पीआय विलास पुजारीच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

प्रा. किसन चव्हाण यांना दंगलीत अडकवण्याचा पोलिसांचा चेहरा उघड; शेवगावचे तत्कालीन पीआय विलास पुजारीच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

       

शेवगाव – अहमदनगर  १४ मे २३ रोजी शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीच्या दरम्यान रात्री जी दंगल झाली त्यादिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसनराव चव्हाण त्यांच्या नियोजीत दौ-यावर छ. संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला गेले होते. १४ मे रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान ते शेवगाव वरून निघाले व रात्री छ. संभाजीनगर येथून ते १०.३० दरम्यान शेवगावला त्यांच्या निवासस्थानी परत पोहचले होते. दरम्यानच्या काळात शेवगावची दंगल घडून गेलेली होती. तरी ही त्याकाळचे तात्कालीन उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके, अजित पाटील. पीआय विलास पुजारी व पीआय संतोष मुटकूळे यांनी संगनमत करून प्रा. किसन चव्हाण यांच्यावर दंगलीचा खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रा. किसन चव्हाण यांनी मा. जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे त्याच्या वकीलामार्फत अटकपूर्व जामीन दाखल करून खरी परीस्थिती कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली.

कोर्टाने प्रा. किसन चव्हाण यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर खोट्या गुन्हात अडकवले असल्याने प्रा. किसन चव्हाण यांनी तात्कालीन उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके, अजित पाटील. पीआय विलास पुजारी व संतोष मुटकूळे यांच्या विरोधात सीआरपीसी १५६/३ नुसार मे. जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे भादवी कलमानूसार व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश लोणे साहेब यांनी आदेश पारीत करून शेवगाव पोलीसांनी यावर त्याचे म्हणने दाखल करावे असा आदेश पारीत केला होता. परंतु दोन वर्ष उलटूनही शेवगाव पोलीसांनी आजतागायत त्याचे म्हणने मांडले नसल्याने प्रा. किसन चव्हाण यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे याचीका दाखल केली होती व त्यावर मा. उच्च न्यायालयाने आदेश पारीत करून शेवगाव पोलीसांनी त्वरीत अहवाल सादर करावा असा आदेश पारीत केलेला आहे. पुढची सुनावणी ७ ऑगस्ट २०२५ रोजी मे जिल्हा व सत्र न्यायालय अहमद‌नगर न्या. लोणे यांच्यासमोर होणार आहे.

प्रा चव्हाण यांच्यावतीने ऍड दिपक शामदिरे, ऍड कृणाल सरोदे व अॅड किरण जाधव हे कामकाज पाहत आहे.


       
Tags: MaharashtraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित समाजाने आता एकत्र यावे लागेल, नाहीतर भविष्यात कोणी वाली राहणार नाही ; अंजलीताई आंबेडकर यांचा इशारा

Next Post

१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बाळाला दत्तक घेतल्याने खळबळ, ७ जणांवर गुन्हा दाखल ‎

Next Post
१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बाळाला दत्तक घेतल्याने खळबळ, ७ जणांवर गुन्हा दाखल ‎

१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बाळाला दत्तक घेतल्याने खळबळ, ७ जणांवर गुन्हा दाखल ‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
बातमी

ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!

by mosami kewat
October 10, 2025
0

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...

Read moreDetails
पिंपरी-चिंचवड: धावत्या 'ई-बस'ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

पिंपरी-चिंचवड: धावत्या ‘ई-बस’ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

October 10, 2025
भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे.

भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे

October 10, 2025
जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी - ॲड. प्रकाश आंबेडकर

जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 10, 2025
फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

October 10, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home