भंडारा : अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बेकायदेशीरपणे दत्तक घेतल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाईल्ड हेल्पलाईनला ७,००० रुपयांमध्ये बाळाची विक्री झाल्याची तक्रार मिळाली होती, त्यानंतर हे रॅकेट समोर आले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी केलेल्या तपासात ही बाब समोर आली असून, याप्रकरणी सात जणांविरुद्ध Juvenile Justice (Care and Protection of Children) Act, २०१५ च्या कलम ८० आणि ८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर बाळाच्या विक्रीची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या आधारे चाईल्ड हेल्पलाईन, भंडारा येथील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असता, बालकाला दत्तक दिल्याचे समोर आले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी अधिक पुरावे गोळा केले असता, धक्कादायक तपशील समोर आला. साकोली तालुक्यातील एका उपकेंद्रात एप्रिल २०२४ मध्ये जन्मलेल्या एका १५ दिवसांच्या बाळाला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘दत्तक’ म्हणून देण्यात आले होते. विशेष म्हणजे, दत्तक घेणाऱ्या पालकांनी बेकायदेशीर मार्ग अवलंबत भंडारा शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात प्रसूती झाल्याचे बनावट कागदपत्रे दाखवून नगर परिषद, भंडारा येथून नवीन जन्म प्रमाणपत्र देखील मिळवले होते.
या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाशिवाय, केवळ आपापसात संगनमत करून बेकायदेशीररित्या बाळाला दत्तक घेण्यात आले होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत नितीनकुमार साठवणे यांनी साकोली पोलिस स्टेशनमध्ये राजपाल हरीचंद रंगारी (४७), सुचिता हरीचंद रंगारी (४४, दोघे रा. हसारा ता. तुमसर), अजित पतीराम टेभुर्णे (३५), सोनाली अजित टेंभुर्णे (२५), नंदकिशोर मेश्राम (४५), राकेश पतीराम टेभुर्णे (३२) आणि पुष्पलता दिलीप रामटेके (५०, सर्व रा. घानोड ता. साकोली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक आयुक्त योगेश जवादे, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण बांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाल कल्याण समिती अध्यक्ष सानिका वडनेरकर, सदस्य मृणाल बांडेबुचे, महेश सातव, मेघा खोब्रागडे यांच्या सहकार्याने चाईल्ड हेल्पलाईन समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार, विजय रामटेके, विक्की सेलोटे आणि सुनील राने यांनी हे प्रकरण उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
V radaru 2026 je 28 provozovatelů.
Avšak i zde platí, že registrace bez vkladu je spíše výjimkou než pravidlem. Díky tomu mají tato kasina více příležitostí...
Read moreDetails

