पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील मेट्रो प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका वाढला आहे. मेट्रोच्या पिलरखालील दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी टाकण्यात आलेली लाल माती रस्त्यावर पसरल्याने १६ दुचाकीचालक घसरून जखमी झाल्याची घटना खराळवाडी येथे घडली.
पिंपरी-चिंचवड शहरात ६ मार्च २०२२ पासून मेट्रो सेवा सुरू झाली. साडेतीन वर्षांनंतरही दुभाजकांमध्ये रोपे लावण्यात आली नव्हती. त्यामुळे, या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. अखेर, नागरिकांच्या तक्रारीनंतर मेट्रो प्रशासनाने दुभाजकांमध्ये रोपे लावण्याचे काम सुरू केले. मात्र, हे काम करताना कोणतीही योग्य काळजी घेतली गेली नाही. पिंपरी ते वल्लभनगर आगारापर्यंत दुभाजकांमध्ये लाल माती टाकली गेली.
ही माती रस्त्यावर पसरल्याने शनिवारी झालेल्या पावसामुळे चिखल सगळीकडे पसरले. या चिखलामुळे खराळवाडी येथील आऊट मर्जजवळ १६ ते १७ दुचाकी घसरल्या आणि अनेक चालक जखमी झाले.
सुदैवाने, काही दुचाकीचालक मोठ्या वाहनांखाली येण्यापासून थोडक्यात बचावले. या घटनेने मेट्रो प्रशासनाच्या नियोजनशून्य कामावर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नही. मात्र, अपघातात कोणाचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे अक्कलकोटमध्ये युवा एल्गार सभा; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट शहरात भव्य युवा एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये पक्षाचे युवा...
Read moreDetails