ॲड. प्रकाश आंबेडकर : तथाकथित बुद्धिजीवी भाजप – आरएसएसचे चाटूकार
मुंबई : आरएसएस-भाजपच्या सेवेत असलेले काही तथाकथित बुद्धिजीवी दलितांना मुस्लिमांविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी आरएसएस-भाजपच्या अशा चोरांचे ऐकणे थांबवावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, तथाकथित बुद्धिजीवी फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाखाली काम करतात. पण, प्रत्यक्षात ते आरएसएस-भाजपचे चाटुकार आहेत. हे चाटूकार आरएसएस-भाजपचे राजकीय डावपेच राबवत आहेत. दलित आणि मुस्लिमांनी सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या एकत्र येऊ नये हा त्यांचा उद्देश आहे. इस्लामोफोबियाचा प्रसार करण्यासाठी आणि वैदिक हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी आरएसएस-भाजपला ते मदत करत आहेत. त्यांचे ऐकणे बंद करा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.