Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पीएच.डी, सी. ई. टी परीक्षेत गैरकारभार; वंचित युवा आघाडीचे आंदोलन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 10, 2024
in बातमी
0
पीएच.डी, सी. ई. टी परीक्षेत गैरकारभार; वंचित युवा आघाडीचे आंदोलन !
       

पुणे, ता. १०: बार्टी, महाज्योती आणि सारथी यांची संशोधक विद्यार्थ्यांसाठीची संयुक्त परीक्षा काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वडगाव बुद्रुक या ठिकाणी घेण्यात आली होती. परंतु मागे आळंदी येथे झालेल्या  परीक्षेत जसा गैरप्रकार झाला होता तसाच पेपर फुटीचा गैरप्रकार पीएच. डी संयुक्त परीक्षेत झाला आहे. या घटनेची दखल घेत वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करत संबधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.

विद्यार्थ्यांनी पेपर सील आहे का असे पाहिले तर, कोणताही पेपर आजपर्यंत विद्यार्थ्यांना सीलबंद मिळाला नाही. A आणि B हा सेट विद्यापीठाकडून सील करून आला होता. मात्र, C आणि D सेट पूर्णतः त्याची झेरॉक्स कॉपी स्वरूपात होता. पुणे विद्यापीठाच्या पेपर सील नसेल तर देऊ नका अशा सूचना असतात. याबाबत वंचित बहुजन युवा आघाडीने विचारणा केली असता विद्यापीठाने कोणतेही उत्तर न दिल्याचे युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

या घटनेची कोणतीही जबाबदारी बार्टी, महाज्योती, सारथी आणि विद्यापीठ प्रशासन घ्यायला तयार नाही. शासनाचा पूर्णतः सावळा कारभार चालला आहे. यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

या घटनेतील जबाबदार व्यक्तींवर कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आली. बार्टी कार्यालयामध्ये पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी ठिया केलेला असून त्यातील दोन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकारिणीने पेपर फुटी संदर्भात संबंधित सर्वच दोषी अधिकाऱ्यांवर , कायदेशीर कारवाई करावी म्हणून गुन्हा दाखल करण्याकरिता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गाठले.

यावेळी, वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरे पाटील एड.अफरोज मुल्ला, पुणे शहराध्यक्ष सोमनाथ पानगावे, युवा महासचिव शुभम ज्ञानेश्वर चव्हाण ,कायदे सल्लागार एड. शिरीष पाटील, संघटक रोहन वाघचौरे, सचिव मंगेश कदम, सचिव अक्षय तायडे, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष सागर ढेंबरे , उपाध्यक्ष अजित वाघमारे उद्देश गोरे, विपुल सोनवणे, गौतम तायडे, नवनीत अहिरे वंचित बहुजन माथाडीचे अध्यक्ष विशाल कसबे ,चंद्रकांत कांबळे तसेच संशोधक विद्यार्थी पाटोळे व केदारनाथ बडोदे अनेक विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: BARTIMahajyotipunesarthiVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

धुळ्यात स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने मनुस्मृती दहन !

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांची शिवसेनेच्या निकालावर प्रतिक्रिया !

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकरांची शिवसेनेच्या निकालावर प्रतिक्रिया !

ॲड. प्रकाश आंबेडकरांची शिवसेनेच्या निकालावर प्रतिक्रिया !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती
बातमी

इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती

by mosami kewat
March 13, 2026
0

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील डॉ. आंबेडकरनगर येथील रहिवासी तसेच मुंबई येथे कार्यरत असलेले पोलिस अधिकारी चंद्रकांत बाबासाहेब कांबळे यांच्या पत्नी...

Read moreDetails
पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद

पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद

March 13, 2026
परभणी: १० दिवसांचे श्रामनेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी; भन्ते पी. धम्मानंदजी यांची उपस्थिती 

परभणी: १० दिवसांचे श्रामनेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी; भन्ते पी. धम्मानंदजी यांची उपस्थिती 

March 13, 2026
सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

March 12, 2026
OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

March 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home