मौजे मोहोजदेवढे येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन; प्रा. किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक
अ.नगर : आज सोमवार रोजी सकाळी 9 वाजता मौजे. मोहोजदेवढे ता. पाथर्डी वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन आणि प्रा. किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक मारुती मंदिराच्या सभामंडपात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, शेवगाव पाथर्डी तालुक्यातील किमान १५० घोंगडी बैठका झाल्या या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मोठी जनशक्ती वंचित बहुजन आघाडीमध्ये तयार झाली तसेच बहुतेक शेतकरी, गोरगरीब कुटुंबांना,घरकुल, डोल, कुपण, शिवरस्ते, पाणंद रस्ते, वीजपुरवठा संदर्भात अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
विधानसभा निवडणुका जवळ आल्याने घरात बसलेले आणि जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेले मतदारसंघातील कारखानदार घराबाहेर पडले आहेत. निवडणुका आल्यावरच या प्रस्थापित कारखानदारांना जनतेची आठवण येते. या कारखादारांना या निवडणुकीत जनतेने जागा दाखवण्याचे ठरवलेले आहे. पुढील काळात सर्व समाज बांधवांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी कायमस्वरूपी लढा देत राहू. सर्वसामान्यच्या गोरगरीबाच्या न्याय हक्काच्या या संघर्षमय स्वाभिमानी लढाई ला आपण साथ द्या. असे आवाहनही प्रा चव्हाण यांनी बोलतांना केले.
या प्रसंगी विद्यमान सरपंच रावसाहेब देवढे पाटील, विष्णू खंडागळे, आजिनाथ देवढे पाटील, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, लक्ष्मण मोरे, संजय सिरसाठ, सिध्दु गर्जे, अरविंद साळवे, तुकाराम काटे, पंढरीनाथ सोनवणे, बंडा देवढे, केजी उबाळे, विजू दादा खंडागळे, आनंद उबाळे, देवीदास भारस्कर , बाळू उबाळे, विकास उबाळे, रणजित थोरात, संतोष सिरसाठ, पाथर्डी शहराध्यक्ष राजुशेठ पठाण, शिवाजी सिरसाठ, राजु सिरसाठ, शंकर सिरसाठ, रामा सोनवणे आणि ईतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा कार्यकर्ते गोरख देवढे पाटील यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार शंकर सिरसाठ यांनी व्यक्त केले.