Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांना माणूस बनवले – बौद्ध एम. एम. भरणे‎

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in Uncategorized, बातमी
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांना माणूस बनवले – बौद्ध एम. एम. भरणे‎
       


‎परभणी : परभणी येथील राहुल नगरमधील विशाखा बुद्ध विहारात आयोजित वर्षावास कार्यक्रमात ज्येष्ठ बौद्ध एम. एम. भरणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी असलेले योगदान या विषयावर महत्त्वपूर्ण धम्मप्रवचन दिले.
‎
‎यावेळी बोलताना एम. एम. भरणे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील भारतीयांना बौद्ध धम्म देऊन ज्या लोकांचे माणूसपण हिरावून घेतले गेले होते, त्यांना पुन्हा माणूस बनवले. त्यांनी या लोकांना जगण्याचा संवैधानिक अधिकार दिला. देशासाठी बहुमोल असे संविधान लिहून, ‘एक व्यक्ती, एक मूल्य’ या समतेच्या सूत्राने देशाला एकसंध ठेवण्याचे मोठे योगदान दिले, असे प्रतिपादन एम. एम. भरणे यांनी केले.
‎
‎बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲड. भीमरावजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार ही वर्षावास प्रवचन मालिका राबवण्यात येत आहे, असे भरणे यांनी सांगितले. या मालिकेअंतर्गत ते विविध विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचन देत आहेत.
‎
‎या वर्षीही दरवर्षीप्रमाणे आषाढ पौर्णिमेपासून म्हणजेच दि. १० जुलै २०२५ पासून वर्षावास कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या वर्षावास निमित्ताने वैशाली महिला मंडळाच्या वतीने राहुल नगर येथे ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन सुरू करण्यात आले आहे. दररोज दुपारी २ वाजता प्रियतमा उबाळे या ग्रंथाचे वाचन करतात. या प्रसंगी एम. एम. भरणे यांच्या हस्ते भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सामूहिक वंदना घेण्यात आली. शालिनीबाई साबने यांनी भरणे यांचे स्वागत केले.
‎
‎या कार्यक्रमाला शालिनीबाई साबने, कांताबाई साबने, शशिकला मोरे, कल्पना गायकवाड, शशिकला दैलतराव मोरे, लीला खिल्लारे, चंद्रकला गायकवाड, शीला खिल्लारे, गुंफाबाई गवई, सुवर्णा दुधाटे, सरस्वती गायकवाड, साळुबाई शिंदे, कलावती मुळे, वर्षा हतीअंबिरे, बेबीताई जाधव, कमलाबाई मुजमुले, केशर कुरवाडे, राजाबाई कांबळे (पूर्णा), शारदा मुळे, यशवंत मोरे, नागोराव वाघमारे, विठ्ठल कांबळे (पूर्णा) यांसह बहुसंख्य उपासक-उपासिकांनी धम्मश्रवण केले. शेवटी त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


       
Tags: Anjali AmbedkarbuddhismBuddhistDr Babasaheb AmbedkarMaharashtraparbhaniPrakash Ambedkar
Previous Post

घाबरू नका मी तुमच्यासोबत! कार्यकर्त्यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा संदेश!

Next Post

तत्वज्ञानाला परिवर्तनाच्या लढ्याशी जोडणाऱ्या संशोधक- डॉ गेल ओमव्हेट

Next Post
तत्वज्ञानाला परिवर्तनाच्या लढ्याशी जोडणाऱ्या संशोधक- डॉ गेल ओमव्हेट

तत्वज्ञानाला परिवर्तनाच्या लढ्याशी जोडणाऱ्या संशोधक- डॉ गेल ओमव्हेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आरक्षण : वास्तव आणि विपर्यास
पुस्तक प्रकाशन

आरक्षण : वास्तव आणि विपर्यास

by mosami kewat
September 15, 2025
0

संपादक : डॉ. ज्ञानराजा चिघळीकरपरीक्षक : अनिल वैद्य (माजी न्यायाधीश, नाशिक) भारतातील आरक्षण हा केवळ राजकीय वादाचा विषय नसून सामाजिक...

Read moreDetails
पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय - अॅड. प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय – अॅड. प्रकाश आंबेडकर

September 15, 2025
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; साकोली येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; साकोली येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न

September 15, 2025
इगतपुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

इगतपुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 15, 2025
Ahmadnagar : वंचित बहुजन आघाडीच राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे - प्रा. किसन चव्हाण

Ahmadnagar : वंचित बहुजन आघाडीच राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे – प्रा. किसन चव्हाण

September 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home