पालघर : एकीकडे भारत डिजिटल इंडिया चया दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून एक हृदयद्रावक चित्र समोर आले आहे. म्हसे गावातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
पिंजाळ नदीवर पूल नसल्यामुळे, पावसाळ्यात वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात विद्यार्थी टायरच्या ट्यूबच्या सहाय्याने नदी पार करत वाकी येथील शाळेत जात आहेत. या संदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही धक्कादायक परिस्थिती पालघरच्या ग्रामीण भागातील शिक्षणासमोरील गंभीर आव्हाने दिसून येत आहे. पावसाळ्यात पिंजाळ नदीला पूर आल्याने पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढतो. अशा परिस्थितीतही शिक्षणाची तीव्र ओढ असलेले हे चिमुकले विद्यार्थी आपल्या जीवाची पर्वा न करता, टायरमधील रबराच्या ट्यूबचा आधार घेऊन हा धोकादायक प्रवास करत आहेत.
विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही रोज ही तारेवरची कसरत करत आहेत. आपल्या पाल्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी त्यांनाही मोठ्या जोखमीला सामोरे जावे लागत आहे. या जीवघेण्या प्रवासामध्ये विद्यार्थ्यांसोबत काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने यात तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
श्रावणी शनिवारची भक्तीमय पर्वणी; शनिशिंगणापूरला भाविकांची अलोट गर्दी
शनिशिंगणापूर - श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारनिमित्त शनिशिंगणापूर मंदिरात शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. पहाटेपासूनच विविध भागातून आलेल्या भक्तांनी दर्शनासाठी...
Read moreDetails