Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 8, 2021
in बातमी
0
       

दि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत असलेल्या हजारो मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सगळीकडून करण्यात येत आहे.

देशातील धर्मांध संघटनांना देशातून आरक्षण संपवायचे आहे त्याचाच एक भाग म्हणून मागासवर्गीय समाजातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळू नये याचे प्रयत्न सतत या संघटनांकडून करण्यात येतात. या धर्मांध संघटनांचा हा आरक्षण विरोधी अजेंडा स्वतःला पुरोगामी म्हणवणारे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार का अमलात आणत आहे असा प्रश्न आता मागासवर्गीय समाजातून विचारला जात आहे.

पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विटरवर चांगलाच समाचार घेतला आहे. ऍड. आंबेडकरांनी ‘महाराष्ट्र शासनाने नवीन जीआरद्वारे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या जातीयवादी भूमिकेचा जाहीर निषेध करतो. मराठा समाजाला खुश करण्यासाठी सरकार आता मागासवर्गीयांचे बळी देत आहे. ‘ असे ट्विट करून राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1390896252712198145

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय भाजप आणि संघाच्या विचारधारेला साजेसा निर्णय आहे त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणताही फरक नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे. एका समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या समाजावर अन्याय करणारे हे सरकार आपले कसे अशी चर्चा आता महाराष्ट्रात सुरु झाली आहे. हा निर्णय सरकारने मागे न घेतल्यास येणाऱ्या काळात याचे तीव्र पडसाद राज्य सरकारला भोगावे लागतील असे दिसत आहे.


       
Tags: Adv.Balasaheb AmbedkarMaratha ReservationNCPobcreservationreservation in promotionscvbaआरक्षणउद्धव ठाकरेऍड. बाळासाहेब आंबेडकरओबीसीपदोन्नतीमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारमागासवर्गीयवंचितवंचित बहुजन आघाडीशिवसेनासरकारी कर्मचारी
Previous Post

रचनात्मक शैक्षणिक मूल्यमापन

Next Post

कोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न

Next Post
कोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न

कोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोल्यात धनगर समाजातील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!
बातमी

अकोल्यात धनगर समाजातील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

by mosami kewat
August 15, 2025
0

अकोला : अकोला जिल्ह्यातील धनगर समाजाचे युवा नेते आणि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होत पक्षाला बळकटी दिली आहे. यामध्ये...

Read moreDetails
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे माचैल माता यात्रेदरम्यान 45 भाविकांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे माचैल माता यात्रेदरम्यान 45 भाविकांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता

August 15, 2025
कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 15, 2025
चिचोली येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे वृक्षारोपण; 'झाडे वाचवा, जीवन वाचवा' चा दिला संदेश

चिचोली येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे वृक्षारोपण; ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’ चा दिला संदेश

August 15, 2025
यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

August 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home