Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

mosami kewat by mosami kewat
September 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
       
जळगाव : पाचोरा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी तालुका जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात करण्यात आली. १ सप्टेंबर रोजी गाळा क्र. १०३, स्व. बापूसाहेब के. एम. पाटील व्यापारी संकुल, भाजी मंडी, पाचोरा येथे वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुक्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील लालसर यांच्या हस्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर काम करण्यास अधिक प्रभावीपणे मदत होणार आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जळगाव पश्चिम उपाध्यक्ष अनिल लोंढे, जळगाव उपाध्यक्ष हरिश्चंद्र सोनवणे, जळगाव पश्चिम महासचिव अमित तडवी, पश्चिम सचिव प्रीतीलाल पवार, वंचित बहुजन युवा आघाडीचे पश्चिम जळगाव जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच पाचोरा तालुकाध्यक्ष संदीप भाऊ जाधव, तालुका उपाध्यक्ष मनोज भाऊ अहिरे, तालुका महासचिव अमोल भाऊ अहिरे, तालुका महासचिव असलम तडवी, तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ अहिरे, तालुका आयटी प्रमुख अनंत भाऊ मोरे, तालुका संघटक प्रमुख विशाल भाऊ सोनवणे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाचोरा तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याबरोबरच जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Tags: jalgaonMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक: इराण , व्हीनेझुएला आणि आता कॅनडा ! 

Next Post
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक: इराण , व्हीनेझुएला आणि आता कॅनडा ! 

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक: इराण , व्हीनेझुएला आणि आता कॅनडा ! 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home