भारिप बमसं’ चे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या उपस्थितीत अकोल्यात बैठकांचे आयोजन !
अकोला: आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात अकोट शहरातील बूथ कमिटी पुर्ण करण्याबाबत आणि पक्षवाढीसाठी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, ओबीसी नेते ॲड. संतोष रहाटे, माजी जिल्हाउपाध्यक्ष दिपक बोडखे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरांमध्ये बैठकांचे नियोजन करण्यात आले.
यावेळी, शहरातील बूथ कमिट्या, पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अकोट शहरामध्ये मुस्लीम समाजातील भागांमध्ये आढावा बैठकांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये काही मुस्लीम समाजातील नागरिकांचा पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. प्रभाग क्रमांक ७ धारळी वेस येथील बैठकीमध्ये साजिद खान पठाण, मुस्लीम मेहतर समाजाचे साबीरभाई यांनी त्यांच्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. तसेच रेस्ट हाऊस येथील बैठकीमध्ये अल्ताफ देशमुख यांनी त्यांच्या समर्थकांसह वंचित मध्ये प्रवेश केला.
दोन तारखेपासून बैठकांचे सत्र अकोट शहरांमध्ये वंचितच्या वतीने चालू आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीचे नियोजन या ठिकाणी करण्यात येत आहे, शहरामध्ये मुस्लिम समाज हा पक्षामध्ये प्रवेश करायला एक वटला असून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास करीत आहेत. मुस्लिम समाजातील नागरिकांचे प्रवेश केल्याबद्दल शहर वंचित बहुजन आघाडी त्यांचे स्वागत करीत आहे. कार्यक्रमाला सय्यद शरीफ राणा, मुस्ताक पटेल, सुनील अंबळकार, विशाल आग्रे, दिनेश घोडेस्वार, मुस्ताक शहा, नितीन वाघ, जम्मू पटेल, अक्षय तेलगोटे, दिनेश सरकटे,आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.