Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

२५ डिसेंबरला नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 20, 2023
in बातमी
0
२५ डिसेंबरला नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन !
       

ॲड. प्रकाश आंबेडकर मांडणार सर्वसमावेशक समाजाचा आराखडा!

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासारख्या धार्मिक, सामाजिक, राजकीय संघटना या विभाजनवादी विचारांना पेरण्याचे काम करत आहेत. समाजाला तोडण्याचे आणि विभागण्याचे काम इथे सुरू आहे. या देशात जर सर्वसमावेशक सामाजिक व्यवस्था निर्माण करायची असेल, सर्वसमावेशकतेच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र आणायचे असेल तर काय केले पाहिजे? या संदर्भातील आराखडा हा नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे २५ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेत मांडण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून इथली विषमतावादी, विभाजनवादी व्यवस्था नाकारली होती. मनुस्मृती दहन दिनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 27 वर्षापासून राज्यभरात भारतीय स्त्री मुक्तीदिन परिषदेचे आयोजन केले जाते. मनुस्मृती ही हिंदू व भारतात आलेल्या इतर धर्मातही विषमतावादी आणि विभाजनवादी सामाजिक व्यवस्था निर्माण करते.
तर राज्यघटनेच्या माध्यमातून संत चार्वाक, बुद्ध, महावीर, गुरु नानक, संत कबीर, संत रविदास, संत एकनाथ, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव या संताना अभिप्रेत असलेली समताधिष्ठित आणि सर्वसमावेशक सामाजिक व्यवस्था निर्माण करणे ही इथल्या सर्व राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांची जबाबदारी होती. असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

संविधानाने संपूर्ण समतेची हमी दिली तरी आजही आपल्या देशातील राजकिय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था प्रचंड विषमतेची आहे. कायदा संविधानाचा परंतू व्यवस्था मनुस्मृतीची आहे.

लोकसभा विधानसभांमध्ये महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. महिलांमधील शिक्षणाचे प्रमाण चिंताजनक रित्या कमी आहे. दलित, आदिवासी, ओबीसी स्त्रिया गरीबी, बेकारी, निरक्षरता, अत्याचार व भेदभावाच्या बळी आहेत. कारण, आजही ब्राह्मणी वर्चस्वाची व्यवस्था मजबूत आहे. अशा सामाजिकदृष्ट्या गंभीर मुद्द्यांकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

नागपुरात होणाऱ्या स्त्री मुक्ती दिन परिषदेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे उपस्थित होते.


       
Tags: MaharashtranagpurPrakash AmbedkarStri muktiVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

चोहट्टा पोटनिवडणुक विजयाचा ‘वंचित’ कडून जल्लोष.

Next Post

संसद सुरक्षा प्रश्नावर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी बोलायला हवं – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
संसद सुरक्षा प्रश्नावर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी बोलायला हवं – ॲड. प्रकाश आंबेडकर

संसद सुरक्षा प्रश्नावर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी बोलायला हवं - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेणार भेट!
Uncategorized

आंदोलन मुंबईतील मंत्रालयात नेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही : ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
September 18, 2025
0

संशोधक विद्यार्थ्यांच्या उपोषणावरुन सरकारवर टीक! पुणे : पुण्यात संशोधक विद्यार्थी उपोषणाला बसले असतानाही पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही, असा...

Read moreDetails
स्थानिक स्वराज्य निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार ; नागपुरात  वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

स्थानिक स्वराज्य निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार ; नागपुरात वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

September 18, 2025
बीड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या; वंचितचे तहसीलदारांना निवेदन!

बीड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या; वंचितचे तहसीलदारांना निवेदन!

September 18, 2025
Mahabodhi Mahavihara Protest : मुंबईत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश मोर्चा; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती!

Mahabodhi Mahavihara Protest : मुंबईत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश मोर्चा; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती!

September 17, 2025
अकोल्यात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश आंदोलन!

Mahabodhi Mahavihara Protest : अकोल्यात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश आंदोलन!

September 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home