Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ओडिशात सामाजिक विषमतेचा कळस: दलित स्वयंपाकीची नियुक्ती केल्याने पालकांचा अंगणवाडीवर बहिष्कार

mosami kewat by mosami kewat
February 12, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ओडिशात सामाजिक विषमतेचा कळस: दलित स्वयंपाकीची नियुक्ती केल्याने पालकांचा अंगणवाडीवर बहिष्कार
       

ओडिशा : एकीकडे देश प्रगती आणि समानतेच्या गप्पा मारत असताना, ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातून सामाजिक विषमतेचे एक धक्कादायक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील नुआगाव येथील एका अंगणवाडी केंद्रात दलित महिलेची स्वयंपाकी म्हणून नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ पालकांनी आपल्या मुलांच्या उपस्थितीवर पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही धक्कादायक परिस्थिती कायम असून, यामुळे मुलांचे शिक्षण आणि पोषण दोन्ही धोक्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

नुआगाव येथील अंगणवाडी केंद्रात २० नोव्हेंबर रोजी शर्मिष्ठा सेठी (२१) यांची स्वयंपाकी म्हणून नियुक्ती करण्यात आली. शर्मिष्ठा या पदवीधर असून गावातून या पदासाठी अर्ज करणाऱ्या त्या एकमेव उमेदवार होत्या. केवळ ५,००० रुपये मानधन असूनही त्यांनी जिद्दीने हे काम स्वीकारले. मात्र, त्या दलित समाजातील असल्याने गावातील सवर्ण पालकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आणि आपल्या मुलांना केंद्रात पाठवणे बंद केले. (Odisha news)

अंगणवाडी सेविका लिजारानी पांडव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या केंद्रात एकूण ४२ मुलांची नोंदणी आहे:

६ महिने ते ३ वर्षे: २२ मुले

३ ते ६ वर्षे: २० मुले

सध्या ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांनी केंद्रात येणे पूर्णपणे बंद केले आहे. लहान मुलांचे पालक केवळ कोरडे रेशन (सत्तू, अंडी) घरी घेऊन जात आहेत, मात्र शिजवलेले अन्न घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. इतकेच नाही तर, एका स्तनदा मातेने संतापून सरकारी रेशन घेणेही बंद केले आहे. (Odisha news)

हा वाद विकोपाला गेल्याने जिल्हा प्रशासनाचे  या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी ब्लॉक आणि तहसील स्तरावरील अधिकाऱ्यांनी गावात अनेक बैठका घेतल्या आहेत. पालकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्याप पालक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. (Odisha news)

अंमलबजावणीतील त्रुटी आणि ग्रामीण भागातील खोलवर रुजलेली जातीयता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. एका बाजूला प्रशासन ‘बेटी पढाओ’ आणि ‘समानता’ यांसारखी अभियाने राबवत असताना, प्रत्यक्ष जमिनीवर मात्र एका सुशिक्षित दलित तरुणीला तिच्या हक्काच्या कामात सामाजिक विरोधाचा सामना करावा लागत आहे.


       
Tags: ConstitutionDr Babasaheb AmbedkarnewsOdisha news
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत दिनेश जाधव यांचा असंख्य समर्थकांसह ‘वंचित’मध्ये प्रवेश

Next Post

अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे गरजेचे – विजय चौरपगार

Next Post
अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे गरजेचे – विजय चौरपगार

अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे गरजेचे - विजय चौरपगार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बातमी

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

by mosami kewat
March 26, 2026
0

पनवेल : वंचित बहुजन आघाडीच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल महानगर व पनवेल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे...

Read moreDetails
‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

March 26, 2026
औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

March 26, 2026
आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

March 26, 2026
नागपूरची ठिणगी !

नागपूरची ठिणगी !

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home