Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

22 प्रतिज्ञांवर आक्षेप देशासाठी धोक्याची घंटा !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
22 प्रतिज्ञांवर आक्षेप देशासाठी धोक्याची घंटा !
       

१४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांना बौध्द धम्माची दीक्षा देताना २२ प्रतिज्ञा दिल्या. नुकतेच दिल्ली येथे ५ ऑक्टोबर २०२२ला १० लाख लोकांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी २२ प्रतिज्ञा घेतल्या. त्यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. कुणी कोणती खाजगी प्रतिज्ञा घ्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही काय मंत्रीपदाची सरकारी शपथ आहे काय? की ती विशिष्ट नमुन्यात राज्यपाल व लोकांसमोर घ्यायची ?
खाजगी प्रतिज्ञा घेणे हा संविधानाच्या कलम १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे. हा काय कट रचून केलेला गुन्हा आहे काय?

कुणीकोणत्या धर्माचे पालन करावे हा सुद्धा संविधानाच्या कलम २५ नुसार प्रत्येक नागरिकास मूलभूत हक्क आहे. पण, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतले. ते प्रकरण असे.राजेंद्रपाल गौतम हे दिल्लीच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या सीमापुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते दिल्ली सरकारमध्ये समाज कल्याण मंत्री होते. दिल्लीला ५ ऑक्टोबर २०२२ म्हणजे अशोक विजयादशमीला १० हजार लोकांनी राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीमध्ये बौध्द धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी २२ प्रतिज्ञा घेतल्या. तोच राजेंद्र पाल गौतम यांच्या विरोधी लोकांनी राजेंद्र पाल गौतम यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप केला. दिल्लीत त्यांच्या विरोधात आंदोलन केले. गौतम हे दिल्ली येथे बौद्ध धर्मांतर कार्यक्रमात सहभागी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली गेली.

गौतम यांच्यावर दुसरा आरोप केला होता की, ऑक्टोबर २०२५ पर्यंत १० कोटी हिंदूंना बौद्ध अनुयायी बनवण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. त्यांना धमकीवजा फोन येवू लागले.विरोधकांचा प्रचंड विरोध बघून राजेंद्र पाल गौतम यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

माझ्या मते २२ प्रतिज्ञाला विरोध करणे ही बाब लोकशाहीवर घाव घालणारी आहे. नागरिकांना वैयक्तिक जीवनात प्रतिज्ञा घेण्याचा हक्क आहे. प्रतिज्ञा त्याने स्वतः स्वीकारली असते त्यामुळे इतरांना त्रास होण्याचे काहीच कारण नाही. त्यामध्ये कोण्या देव देविता किंवा धर्म यांचा अपमान होण्याचाही मुद्दा नाही. किंवा प्रतिज्ञा घेणारी व्यक्ती दुसऱ्यांना काही सांगत नसते तर ती स्वतः साठी प्रतिज्ञा घेत असते. कुणाची बदनामी किंवा धार्मिक भावना दुखावणे तेव्हाच समजल्या जाते की, जेव्हा एखादी व्यक्ती तसे भाषण देतो किंवा लेखन करतो.

प्रतिज्ञा घेणे म्हणजे काही भाषण नव्हे, लेख सुध्दा नव्हे की, कुणाची बदनामी व्हावी किंवा धार्मिक भावना दुखावल्या जाव्यात.२२ प्रतिज्ञा केंद्र सरकारने हिंदीत प्रकाशित डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंडात सुध्दा आहेत. खंड १७ मध्ये असल्याचे खुद्द गौतम यांनी सांगितले; पण ऐकते कोण?

गंभीर बाब अशी की, १९५६ पासून कुणी आक्षेप घेतला नाही. आता ६६ वर्षानंतर संविधान विरोधी ताकद एकवटून हा विरोध झाला आहे. त्यात सर्वच संविधान द्रोही समाविष्ट आहेत. देशासाठी ही धोक्याची घंटा आहे.

– अनिल वैद्य
(लेखक माजी न्यायाधीश आहेत)


       
Tags: 22 vowsAnil VaidyabuddhismRajendra Pal Gautam
Previous Post

वंचित बहुजन युवा आघाडीचा ‘रेल रोको’चा इशारा

Next Post

खर्डा गट ओबिसीचा बालेकिल्ला असल्यामुळे आमदार, खासदार विकासापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र करत आहेत – ॲड. डॉ. अरुण जाधव

Next Post
खर्डा गट ओबिसीचा बालेकिल्ला असल्यामुळे आमदार, खासदार विकासापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र करत आहेत – ॲड. डॉ. अरुण जाधव

खर्डा गट ओबिसीचा बालेकिल्ला असल्यामुळे आमदार, खासदार विकासापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र करत आहेत - ॲड. डॉ. अरुण जाधव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा
बातमी

स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा

by mosami kewat
August 10, 2026
0

मनमाड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय काळात बसविण्यात आलेले रबरी व फायबरचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही...

Read moreDetails
मांडेगाव येथे 'जय भीम बुद्ध विहारा'चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

मांडेगाव येथे ‘जय भीम बुद्ध विहारा’चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

August 10, 2026
ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

August 10, 2026
ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

August 10, 2026
मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

August 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home