Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

२१ डिसेंबरची निवडणूक पुढे ढकलून एकत्र निवडणूक घ्यावी!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 17, 2021
in बातमी
0
२१ डिसेंबरची निवडणूक पुढे ढकलून एकत्र निवडणूक घ्यावी!
       

वंचित बहुजन आघाडीची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी.

मुंबई : ‘येत्या २१ डिसेंबर रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलत ओबीसीच्या खुल्या गटात प्रवर्तीत जागा व इतर सर्व जागांची निवडणूक दोन टप्प्यात न घेता एकत्रित घेण्यात यावी,’ अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबत राज्याचे निवडणूक आयुक्त उर्विंदर पाल सिंग मदान यांना भेटून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.

‘ओबीसींच्या 27% प्रवर्गातील स्थगित केलेल्या जागांवरील खुल्या गटातील निवडणुक प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक सुप्रीम कोर्टाने निर्देशित केल्याप्रमाणे एक दिवसात जाहीर करावे व त्यानुसारच उर्वरित 73% प्रवर्गातील निवडणूकीच्या  कार्यक्रमाचे वेळापत्रक सुधारित करावे.’ अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित जागांची निवडणूक जरी स्थगित केली आहे. तरी इतर प्रवर्गातील जागांवर ठरलेल्या वेळापत्रकानुसार निवडणुक होणार आहे. हि बाब न्यायाला धरुन  नाही.

मा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेल्या आताच्या निर्देशानुसार ओबीसी च्या २७% जागा आणि इतर प्रवर्गाच्या ७३% जागांच्या निवडणूक एकत्रित घेऊन तसा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने केवळ एका दिवसात नव्याने सूचना काढून एकत्रित निवडणूक घेऊन एकत्रितपणे निकाल जाहीर करावेत असे निर्देश दिले आहेत. राज्यात १०६ नगरपंचायतींमधील एकूण १ हजार ८०२ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. १,८०२ पैकी ३४४ जागांवर ओबीसी आरक्षण आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर ४ महानगरपालिकांतील ४ रिक्तपदांच्या आणि ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींतील ७ हजार १३० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू ठेवला जाणार आहे. ह्याला वंचित बहूजन आघाडीचा विरोध आहे. तसेच हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होईल. म्हणून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक कार्यवाही करतांना २१ तारखेची निवडणूक पुढे ढकलून ओबीसी प्रवर्गातील खुल्या प्रवर्गात परावर्तित होणाऱ्या जागा आणि इतर जागांची एकत्रित निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी मोहन राठोड, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान, महासचिव आनंद जाधव आदी उपस्थित होते.


       
Tags: ElectionElection commissionMaharashtraobcPrakash AmbedkarreservationVanchit Bahujan Aaghadiआरक्षणनिवडणूकनिवडणूक आयोगबाळासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रवंचित बहुजन आघाडी
Previous Post

चैत्यभूमी जगभरातील आंबेडकरवाद्यांचे उर्जास्थान

Next Post

स्टॅन्ड-अप कॉमेडी : ब्राह्मणी साच्यातली विनोद बुद्धी

Next Post
स्टॅन्ड-अप कॉमेडी : ब्राह्मणी साच्यातली विनोद बुद्धी

स्टॅन्ड-अप कॉमेडी : ब्राह्मणी साच्यातली विनोद बुद्धी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे-बारामतीत ED ची धडक! 108 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार आनंद लोखंडेच्या मालमत्तांवर छापे; राजकीय कनेक्शनची चर्चा
बातमी

पुणे-बारामतीत ED ची धडक! 108 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार आनंद लोखंडेच्या मालमत्तांवर छापे; राजकीय कनेक्शनची चर्चा

by mosami kewat
December 10, 2025
0

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज पुणे आणि बारामती जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद...

Read moreDetails
बाबासाहेबांच्या उपस्थितीत १९४५ साली अकोल्यात संपन्न झालेली वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनची परिषद

बाबासाहेबांच्या उपस्थितीत १९४५ साली अकोल्यात संपन्न झालेली वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनची परिषद

December 10, 2025
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य ‘महा आरोग्य शिबीर’ उत्साहात संपन्न!

औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य ‘महा आरोग्य शिबीर’ उत्साहात संपन्न!

December 9, 2025
‘सत्य सर्वांचे आदी घर’ रुजवणारे डॉ. ‘बाबा’ हरपले! हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

‘सत्य सर्वांचे आदी घर’ रुजवणारे डॉ. ‘बाबा’ हरपले! हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

December 9, 2025
भूषण गवईचा आरक्षणावरचा विषारी हल्ला अर्थात संवैधानिक द्रोह

भूषण गवईचा आरक्षणावरचा विषारी हल्ला अर्थात संवैधानिक द्रोह

December 9, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home