संजीव चांदोरकर
गरीबी हा प्रॉब्लेम नाही
गरीब लोक हा प्रॉब्लेम आहे, कारण ते आळशी असतात, शासकीय फ्रीबिज वर जगायची त्यांना सवय लागली आहे
तरुणांमधील वैफल्य हा प्रॉब्लेम नाही
तरुण वर्ग प्रॉब्लमॅटिक आहे, कारण त्यातील प्रत्येकाला कॉलेजनंतर मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या हव्या आहेत
शेतीक्षेत्रातील अरिष्ट हा प्रॉब्लेम नाही
शेतकऱ्यांना जागतिक मार्केटचा अभ्यास करून नवीन प्रयोग करायला नको असतात, शासनाच्या सबसिडी आणि हमीभाव फक्त हवे असतात
खाजगी उद्योगाची अवाजवी नफेखोरी हा प्रॉब्लेम नाही
सार्वजनिक मालकी / उपक्रम हा प्रॉब्लेम आहे, कारण ते जन्माने अकार्यक्षम असतात
वित्त क्षेत्रातील सट्टेबाजी हा प्रॉब्लेम नाही
सामान्य गुंतवणूकदारांची निरक्षरता आणि लवकरात लवकर आपल्या गुंतवणुकी दुप्पट होण्याची त्यांची आस हा प्रॉब्लेम आहे
कॉर्पोरेट/ वित्त भांडवलशाही हा प्रॉब्लेम नाही
पुन्हा पुन्हा कालबाह्य झालेल्या समाजवादाच्या कढीला उकळ्या काढल्या जातात हा प्रॉब्लेम आहे.
या नॅरेटीव्हला सतत काउंटर करण्याची गरज आहे





