नाशिक : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरात दिवसभर अन्नदान करण्यात आले. महानगर महासचिव दीपक पगारे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी या अन्नदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर भाविकांना भोजन वाटप केले.
या उपक्रमाला युवा आघाडीच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. यामध्ये जिल्हा अध्यक्ष चेतन दादा गांगुर्डे, जिल्हा उपाध्यक्ष लीना खरात, जिल्हा संघटक सागर भाऊ रिपोवटे, युवा जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे, बाळा भाऊ शेजवळ, तालुका उपाध्यक्ष, युवा नाशिक तालुका अध्यक्ष विकि भाऊ वाकळे आणि युवा नाशिक तालुका महासचिव संतोष वाघ यांचा समावेश होता.
या अन्नदान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सनी जाधव, मनोज उबाळे, हर्षल उघडे, नाना तपासे आणि राहुल नेटवाटे यांनी संयोजकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.