मुंबई : आदिवासींच्या घरात बाहेरच्या लोकांना बसवून आदिवासींना हुसकावणे, त्यांचे शोषण करणे त्यांना वंचित ठेवणे ही नरेंद्र मोदींची योजना आहे. हे ताबडतोब थांबले पाहिजे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विरवरून केली आहे.
मोदी आणि त्यांच्या भांडवलदार मित्रांच्या पैशांच्या लालसेला अंत नाही.
आदिवासी ही जंगलाची लेकरं आहेत. त्यांचे जंगलाशी सहजीवनाचे नाते आहे आणि जंगल त्यांच्यासाठी संपूर्ण जीवन पद्धतीचे प्रतिनिधित्व करते. एक घर, एक अद्वितीय संस्कृती, पूजा, अन्न ही आदिवासींची ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
आदिवासी अस्तित्त्वात आहेत कारण, जंगल आहे आणि जंगल अस्तित्त्वात आहे कारण आदिवासी आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लोकांना पायदळी तुडवून त्यांचे अधिकार, विशेषत: आदिवासींचे हक्क रद्द केल्यावर कोणतीही आर्थिक वाढ होऊ शकत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.