Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
April 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नांदेड : नांदेड जिल्ह्यात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. तसेच गॅस पुरवठा सुरळीत करण्याची व काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Gas Cylinder Shortage)

Also Read : Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

दक्षिण जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन आणि उत्तर जिल्हा अध्यक्ष राज आटकोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेतली. सध्या जागतिक परिस्थितीमुळे देशात गॅसचा तुटवडा असल्याचे सांगितले जात असले तरी नांदेड जिल्ह्यात कृत्रिम टंचाई निर्माण करून काही गॅस एजन्सीकडून जादा दराने अवैध विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला.

Also Read : Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना एजन्सीसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून याचा फटका कामगार, शेतकरी व सर्वसामान्यांना बसत आहे. तसेच सीएनजी गॅसच्या अभावामुळे वाहनचालकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. महिलांना होणारा त्रास आणि रांगेत उभे राहून घडलेल्या दुर्दैवी घटनांकडेही लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. (Gas Cylinder Shortage)

यावर तात्काळ उपाययोजना करून गॅसचा नियमित पुरवठा करावा आणि जादा दराने विक्री करणाऱ्या एजन्सींवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. यावेळी जिल्हा महासचिव रवी पंडित, दीपक मगर, जिल्हा संघटक संजय टिके, कायदेशीर सल्लागार अॅड. जयपाल ढवळे, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

Tags: Black MarketingBreaking NewsCNG CrisisFuel CrisisGas ShortageGas SupplyIran Israel WarLPGCrisisMaharashtra newsnandedPubli cIssuesVanchit Bahujan Aghadi
Previous Post

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Next Post

आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 3, 2026
0

पुणे : पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले की, अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी...

Read moreDetails
Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

April 3, 2026
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

April 3, 2026
Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

April 2, 2026
घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

April 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home