Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदेड: खोब्रागडे नगरमधील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयित आरोपीला अटक, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी

mosami kewat by mosami kewat
September 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नांदेड: खोब्रागडे नगरमधील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयित आरोपीला अटक, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी
       

न्यायासाठी सदैव पाठीशी राहण्याचे आश्वासन; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

नांदेड : नांदेड शहरातील खोब्रागडे नगर परिसरात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन  बालिकेसोबत घडलेल्या गंभीर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला असून, न्याय मिळेपर्यंत कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, खोब्रागडे नगर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेला चाकूचा धाक दाखवून पूर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका २८ वर्षीय आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विशेषतः अल्पवयीन आणि मतिमंद बालिकेला लक्ष्य करण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

ही घटना समोर येताच वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवक प्रतिनिधि कुलदीप राक्षसमारे व पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत पीडित कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबाला कायदेशीर आणि सामाजिक आधार मिळावा, तसेच प्रकरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू केला. आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून त्याला तातडीने अटक करण्याची मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली होती.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून संशयित आरोपी आदिनाथ जाधव याला अटक केली आहे. मात्र, केवळ अटक करून प्रकरण संपत नाही, तर पीडितेला न्याय मिळण्यासाठी संपूर्ण तपास पारदर्शकपणे आणि वेगाने पूर्ण होणे आवश्यक असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रकरणातील पुरावे, पीडित बालिकेचे संरक्षण, कुटुंबाला आवश्यक मदत आणि न्यायालयीन प्रक्रियेत योग्य पाठपुरावा याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन नेते शिवा नरंगले नगरसेवक अॅड शेख बिलाल पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या कठीण प्रसंगी कुटुंबाने घाबरून जाऊ नये, न्यायासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्ष त्यांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन शिष्टमंडळाने दिले. 

पीडित कुटुंबाला सामाजिक दबाव, आर्थिक अडचणी किंवा कायदेशीर प्रक्रियेमुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी संघटनेच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने अशा घटनांकडे केवळ गुन्हा म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक परिस्थितीचाही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बालिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त, नागरिकांमध्ये जनजागृती तसेच पीडितांना तातडीची कायदेशीर व मानसिक आधारव्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

या घटनेतील पीडित बालिकेला न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा पाठपुरावा सुरूच राहील, अशी भूमिका शिष्टमंडळाने व्यक्त केली. आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी आणि पीडित बालिकेला व तिच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार सर्व आवश्यक मदत मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


       
Tags: Crime newsMaharashtrananded khobragade CasePoliticalVanchit Bahujan Aghadiनांदेड
Previous Post

नवीन श्रावस्ती नगरातील १५० हून अधिक कुटुंबे बेघर होण्यापासून वाचली; वंचितच्या नगरसेवकांसह सम्यकच्या नेत्यांच्या लढ्याला यश

Next Post

जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

Next Post
जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home