परभणी : मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढताना दिसत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक तरुण मुस्लिम युवकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका ताकदीने लढवून जिंकण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
परभणी येथे वंचित बहुजन आघाडीत तरुण मुस्लिम युवकांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे परभणी मनपा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रवेश सोहळा युवा जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान यांच्या माध्यमातून झाला.
यावेळी प्रवेश केलेल्या मुस्लिम युवकांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनिता साळवे, जिल्हा सचिव प्रा. गौरव कुमार तारू, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाढे, युवा जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान, जिल्हा सचिव युसूफ कलीम, युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे, युवा कोषाध्यक्ष मिलिंद खंदारे,
रतन मोरे (पोखरणी), तालुका सदस्य राजू पवार, तालुका उपाध्यक्ष यशवंत सोनवणे, तालुका उपाध्यक्ष कलीमभाई, संदीप खाडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीने परभणीमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा निर्धार केला असून, मुस्लिम युवकांच्या या पक्षप्रवेशामुळे पक्षाला चांगलाच पाठिंबा मिळाल्याचे पहायला मिळत आहे
मोदींचे परराष्ट्र धोरण: प्रतिमा विरुद्ध वास्तव
लेखक : आज्ञा भारतीय २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले, तेव्हा देशाच्या राजकीय वातावरणात एक उत्साही लाट पसरली...
Read moreDetails