Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

mosami kewat by mosami kewat
July 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत दुर्घटनांची मालिका सुरू असतानाच मानखुर्द परिसरात रविवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. धोकादायक घोषित करण्यात आलेल्या तीन मजली चाळीचा मोठा भाग अचानक कोसळल्याने ६ लहान मुले, एका महिलेसह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. (Mankhurd Building Collapse)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चाळ अतिधोकादायक असल्याने महापालिकेने ती रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रहिवासी रविवारी घरातील सामान हलविण्याचे काम करत होते. मात्र रात्री साडेआठच्या सुमारास चाळीचा मोठा भाग अचानक कोसळला आणि अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले.

Also Read : नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच चिमुकले आणि एका महिलेचा मृत्यू झाला असून शेजारील घरातील एका मुलाचाही जीव गेला आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, मुंबई महापालिका, पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवून अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (Mankhurd Building Collapse)

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाळीची रचना अधिक कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Tags: building collapseMaharashtraMankhurd Building CollapseMonsoonmumbaiMumbai Rainsrain
Previous Post

आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !

Next Post

BANRF फेलोशिपमधील संशोधकांची संख्या ३०० करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुण्यात बार्टीला निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी
बातमी

फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी

by mosami kewat
August 15, 2026
0

कळमनुरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ कळमनुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात निषेध...

Read moreDetails
कळमनुरी: वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मूकबधिर विद्यालयात फळवाटप करून स्वातंत्र्यदिन साजरा

कळमनुरी: वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मूकबधिर विद्यालयात फळवाटप करून स्वातंत्र्यदिन साजरा

August 15, 2026
कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

August 15, 2026
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

August 15, 2026
शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

August 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home