Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

BANRF फेलोशिपमधील संशोधकांची संख्या ३०० करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुण्यात बार्टीला निवेदन

mosami kewat by mosami kewat
July 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
BANRF फेलोशिपमधील संशोधकांची संख्या ३०० करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुण्यात बार्टीला निवेदन
       
पुणे : आज पुण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या महासंचालकांना निवेदन देत Dr. Babasaheb Ambedkar National Research Fellowship (BANRF) योजनेतील लाभार्थी संशोधकांची संख्या १०० वरून किमान ३०० करण्यात यावी, तसेच सन २०२३, २०२४, २०२५ आणि २०२६ या वर्षांसाठीची जाहिरात पुढील सात दिवसांत प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली.

सम्यक विद्यार्थी आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे की, बार्टीमार्फत राबविण्यात येणारी BANRF योजना अनुसूचित जातीतील पीएच.डी. संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, शासन निर्णयानुसार या योजनेत केवळ १०० संशोधकांना लाभ दिला जातो. राज्यातील पात्र आणि गुणवंत संशोधकांची संख्या लक्षात घेता ही मर्यादा अत्यंत अपुरी असून त्यामुळे अनेक संशोधकांना फेलोशिपपासून वंचित राहावे लागत आहे. असे सम्यक विद्यार्थी आंदोलनाने निवेदनात म्हटले आहे.

तसेच यामुळे लाभार्थी संशोधकांची संख्या किमान ३०० करण्यात यावी आणि गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २०२३, २०२४, २०२५ आणि २०२६ या वर्षांसाठीच्या BANRF योजनेची जाहिरात पुढील सात दिवसांत प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे.

जर या मागण्यांवर सात दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभरातील संशोधकांना सोबत घेऊन बार्टी कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रशांत बोराडे, संघर्ष शंखाड, प्रज्योत गायकवाड, अभिराज कांबळे, किरण साईंदाणे, चैतन्य इंगळे आदी उपस्थित होते.

Tags: BARTIBARTI PhD FellowshipEducationMaharashtraPoliticalpune
Previous Post

मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Next Post

आदिवासी पाडा आजही अंधारात; मूलभूत सुविधांसाठी वंचित बहुजन आघाडीचे घणसोली सहायक आयुक्तांना निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट
बातमी

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

by mosami kewat
September 6, 2026
0

बुलढाणा: मलकापूर तालुक्यात भारिपचे माजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत नारायणराव जाधव यांच्या दुःखद निधनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय...

Read moreDetails
चाँद तक पहुँचे, पर अमानवीय प्रथा ख़त्म नहीं कर पाए: प्रकाश आंबेडकर का तीखा तंज

चाँद तक पहुँचे, पर अमानवीय प्रथा ख़त्म नहीं कर पाए: प्रकाश आंबेडकर का तीखा तंज

September 6, 2026
महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन

महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन

September 5, 2026
ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

September 5, 2026
‘जय भीम Gen Z!’: वंचित बहुजन आघाडीचा नवा उपक्रम

‘जय भीम Gen Z!’: वंचित बहुजन आघाडीचा नवा उपक्रम

September 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home