मुंबई – आपल्या दुःखाचे कारण आपणच शोधले, म्हणजे मला का दुःख झाले याचा विचार करून त्याचे मूळ कारण ओळखले, तर दुःखमुक्ती शक्य होते, असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. एस. के. भंडारे यांनी केले.
चेंबूर येथील महात्मा फुले नगर 1 शाखेत आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गुरु पौर्णिमा आणि वर्षावासाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, भगवान बुद्ध यांच्या काळात वर्षावासात ‘पातीमोक्ख’ — वरिष्ठ भिक्षूंना चुकीची कबुली देण्याची परंपरा होती. त्याप्रमाणे आपणही आपल्या चुका मान्य करून किंवा विरोधकांचे आभार मानून दुःखातून मुक्त होऊ शकतो.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाखाध्यक्षा उषाताई गायकवाड यांनी भूषविले. यावेळी मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा चंदाताई कासले, कोषाध्यक्ष सारिका झिमुर, सचिव (संस्कार) दिलीप लिहिणार, सुनिल बनसोडे, समता सैनिक दलाचे मेजर जनरल बाबू सावंत, मुंबई झोन पाचचे अध्यक्ष अनंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा सरचिटणीस मनिषा गवळी यांनी केले. यशस्वीतेसाठी बुद्धमाला सकपाळ, छाया गवळी, कमल कांबळे, शशिकला राऊत, रेखा खंडागळे, शोभा मगरे, ज्योती मगरे, अर्चना सुरडकर आदींनी परिश्रम घेतले.
शाखेच्या वतीने अॅड. भंडारे यांच्या सन्मानार्थ फटाके वाजविणे व पायावर फुले टाकण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, मात्र त्यांनी सविनय नकार देत अशा सन्मानाचा लाभ केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारालाच द्यावा, असे आवर्जून सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार केवळ वर्षावास उद्घाटन म्हणून फटाके वाजविण्यात आले.
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने, डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी नुकतीच त्यांच्या आजोबांच्या शाळेला, म्हणजेच मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलला...
Read moreDetails