मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक लढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया 10 डिसेंबरपासून सुरू केली होती. अवघ्या दहा दिवसांत पक्षाकडे ६०० पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश समितीने दिली आहे.
या अर्जांची छाननी करून लवकरच उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात येणार असून, 23 डिसेंबरपासून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.अजूनही अर्ज भरण्याची दोन दिवस बाकी आहेत 22 डिसेंबर पर्यंत वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे इच्छुक उमेदवारांचे अर्ज हे स्वीकारले जाणार आहेत.
वंचित बहुजन आघाडी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असून, मुंबईत पक्षाने एक मजबूत आणि व्यापक राजकीय संघटन उभे केले आहे. जनतेमध्ये पक्षाची वाढती स्वीकारार्हता स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांकडून अर्ज प्राप्त होणे हा जनतेच्या विश्वासाचा आणि पक्षाच्या वाढत्या प्रभावाचा पुरावा असून, मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा निर्धार आम्ही प्रत्यक्षात उतरवणार असल्याचा विश्वास वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश कमिटीने व्यक्त केला आहे.






