Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मरण स्वस्त झालय! मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन ते चार जण गंभीर जखमी

mosami kewat by mosami kewat
February 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मरण स्वस्त झालय! मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन ते चार जण गंभीर जखमी
       

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर मेट्रो-४ (ग्रीन लाईन) च्या बांधकामाचा सिमेंटचा मोठा स्लॅब (पॅरापेट) अचानक खाली कोसळला. या भीषण दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. (Slab Collapse in Mulund)

नेमकी घटना काय?

मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील राजीव (मिलान) स्ट्रीट भागात पियर क्रमांक P196 जवळ मेट्रोचे काम सुरू असताना हा अपघात घडला. उंचावरून काँक्रीटचा जड भाग थेट खालून जाणाऱ्या एका रिक्षावर आणि चारचाकी गाडीवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगाऱ्याखाली अडकलेली वाहने बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या धक्कादायक अपघातानंतर एलबीएस रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात आली आहे. (Slab Collapse in Mulund)

यापूर्वीही मेट्रो प्रकल्पाच्या कामातील हलगर्जीपणाबाबत स्थानिक नागरिकांनी आणि तज्ज्ञांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते. आजच्या या दुर्घटनेमुळे मेट्रो प्रशासनाच्या सुरक्षिततेच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असताना पुरेशी सुरक्षा यंत्रणा का नव्हती? असा संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. प्राथमिक तपासात ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली की मानवी चुकीमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


       
Tags: Collapse in MulunddeathMaharashtramumbaiSlab Collapse in Mulund
Previous Post

देवगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची आर्थिक लूट; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा

Next Post

रहेजा बिल्डर वादावरून ‘वंचित’ आक्रमक; मनसेच्या ‘मराठी अस्मिते’वर चेतन अहिरे यांनी उठवले प्रश्नचिन्ह

Next Post
रहेजा बिल्डर वादावरून ‘वंचित’ आक्रमक; मनसेच्या ‘मराठी अस्मिते’वर चेतन अहिरे यांनी उठवले प्रश्नचिन्ह

रहेजा बिल्डर वादावरून 'वंचित' आक्रमक; मनसेच्या 'मराठी अस्मिते'वर चेतन अहिरे यांनी उठवले प्रश्नचिन्ह

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मध्य प्रदेश हादरले! ५० लाख जिंकणाऱ्या KBC विजेत्या तहसीलदार गजाआड; १२७ बनावट खात्यांद्वारे केला भ्रष्टाचार
बातमी

मध्य प्रदेश हादरले! ५० लाख जिंकणाऱ्या KBC विजेत्या तहसीलदार गजाआड; १२७ बनावट खात्यांद्वारे केला भ्रष्टाचार

by mosami kewat
March 27, 2026
0

मध्य प्रदेश: मध्यप्रदेशात एका धक्कादायक प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झालेल्या...

Read moreDetails
बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

March 27, 2026
शिक्षकाच्या आत्महत्येने बीड हादरले; ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

शिक्षकाच्या आत्महत्येने बीड हादरले; ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

March 27, 2026
महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचा भारत 

महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचा भारत 

March 27, 2026
अकोल्यात चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची २३३० वी जयंती उत्साहात; समता सैनिक दलाची मानवंदना

अकोल्यात चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची २३३० वी जयंती उत्साहात; समता सैनिक दलाची मानवंदना

March 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home