Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रहेजा बिल्डर वादावरून ‘वंचित’ आक्रमक; मनसेच्या ‘मराठी अस्मिते’वर चेतन अहिरे यांनी उठवले प्रश्नचिन्ह

mosami kewat by mosami kewat
February 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
रहेजा बिल्डर वादावरून ‘वंचित’ आक्रमक; मनसेच्या ‘मराठी अस्मिते’वर चेतन अहिरे यांनी उठवले प्रश्नचिन्ह
       

मुंबई : गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईत रहेजा बिल्डर आणि राहुल जाधव यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. 

वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी मनसेच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मोठ्या बिल्डरांसमोर मनसेची मराठी अस्मिता गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Vanchit bahujan aghadi)

मनसे नेहमीच ‘मराठी माणूस’ आणि ‘मराठी अस्मिता’ या मुद्द्यावरून राजकारण करते. मात्र, रहेजा बिल्डरकडून छळवणूक होत असलेले राहुल जाधव हे बौद्ध समाजाचे असून ते मराठीच आहेत. मग अशा वेळी मनसेने रहेजाला ‘मनसे स्टाईल’ने धडा का शिकवला नाही,? असा प्रश्न चेतन अहिरे यांनी विचारला आहे.

अहिरे यांनी मनसेच्या भूमिकेवर म्हटले की, मनसे फक्त गरीब अमराठी लोकांना मारहाण करण्यात स्टंटबाजी दाखवते. मात्र, जेव्हा एखाद्या श्रीमंत बिल्डरकडून मराठी माणसावर अन्याय होतो, तेव्हा मनसे मौन बाळगते. मनसे उद्योजक आणि बिल्डरांना पाठीशी घालते आणि केवळ स्टंटबाजीसाठी सामान्य मराठी माणसासमोर नाटक करते. (Vanchit bahujan aghadi)

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह : 

राहुल जाधव यांच्या तक्रारीनुसार रहेजा बिल्डरवर अ‍ॅट्रॉसिटी (Atrocity Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही पोलीस संबंधित बिल्डरला अटक का करत नाहीत? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. तसेच राहुल जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी आणि युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई रहेजा बिल्डरच्या कार्यालयात गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ‘बेकायदेशीररित्या’ अटक केल्याचा आरोप वंचितने केला आहे. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने वंचितच्या पदाधिकाऱ्यांना न्याय दिल्याचेही अहिरे यांनी सांगितले. (Vanchit bahujan aghadi)

‘वंचित’ आपल्या स्टाईलने उत्तर देणार : 

मुंबईतील सामान्य आणि मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहील, असा निर्धार अहिरे यांनी व्यक्त केला आहे. जेव्हा-जेव्हा मुंबईकरांवर अत्याचार होईल, तेव्हा तेव्हा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलने उत्तर देईल, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.


       
Tags: ActActrocityMaharashtrapolicePoliticalRaj ThackerayVanchit Bahujan Aaghadivbafotindiaमनसे
Previous Post

मरण स्वस्त झालय! मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन ते चार जण गंभीर जखमी

Next Post

वंचित बहुजन आघाडीची दारव्हा येथे चिंतन बैठक; आगामी निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा’चा निर्धार

Next Post
वंचित बहुजन आघाडीची दारव्हा येथे चिंतन बैठक; आगामी निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा’चा निर्धार

वंचित बहुजन आघाडीची दारव्हा येथे चिंतन बैठक; आगामी निवडणुकीसाठी 'गाव तिथे शाखा'चा निर्धार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home