Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीची दारव्हा येथे चिंतन बैठक; आगामी निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा’चा निर्धार

mosami kewat by mosami kewat
February 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीची दारव्हा येथे चिंतन बैठक; आगामी निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा’चा निर्धार
       

यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण चिंतन बैठक दारव्हा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी ‘घर तिथे कार्यकर्ता आणि गाव तिथे शाखा’ हा नवा नारा देण्यात आला.

बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक आणि जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, निवडणुका जिंकण्यासाठी बूथ बांधणी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. दारव्हा तालुक्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी प्रत्येक गावात पक्षाची शाखा आणि प्रत्येक बूथवर सक्रिय कार्यकर्ता असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी आगामी काळातील कृती आराखडा सादर करून त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. (Vanchit bahujan aghadi)

या बैठकीचे अध्यक्षपद तालुकाध्यक्ष सदाशिव तायडे यांनी भूषवले. जिल्हाध्यक्षांच्या सूचनांना प्रतिसाद देत, उपस्थित पदाधिकाऱ्यांनी येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत तालुक्यातील विविध गावांमध्ये नवीन शाखा फलकांचे अनावरण करण्याचे आश्वासन दिले. यामुळे तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे वातावरण अधिक सक्रिय होणार असल्याचे चित्र दिसत आहे. (Vanchit bahujan aghadi)

या बैठकीला जिल्हा व तालुक्यातील अनेक  पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये दीपक जाधव (जिल्हा पदाधिकारी), आजाब मेषेकार, अविनाश गुरुदे, गौतम मुजमुले, जया नाईक, नोगिता माडीशेट्टी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम मुजमुले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अविनाश गुरुदे यांनी मानले. या बैठकीमुळे दारव्हा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.


       
Tags: MaharashtraPoliticalpoliticsVanchit Bahujan AaghadivbaforindiaYavatmal
Previous Post

रहेजा बिल्डर वादावरून ‘वंचित’ आक्रमक; मनसेच्या ‘मराठी अस्मिते’वर चेतन अहिरे यांनी उठवले प्रश्नचिन्ह

Next Post

टिपू सुलतान म्हैसूरचा वाघ की राजकारणाचा बळी ?

Next Post
टिपू सुलतान म्हैसूरचा वाघ की राजकारणाचा बळी ?

टिपू सुलतान म्हैसूरचा वाघ की राजकारणाचा बळी ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home