मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 21 डिसेंबर 2025 रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आगामी 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Election) होणारी मतमोजणी आणि परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने, आयोगाने हा बदल केला आहे.
हैदराबाद विमानतळावर बॉम्बच्या धमक्या! तीन आंतरराष्ट्रीय विमाने ‘हाय अलर्ट’वर; सुरक्षा यंत्रणांची कसून तपासणी
परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षार्थींनी या नवीन तारखांची नोंद घ्यावी :
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025: आता 4 जानेवारी 2026 रोजी आयोजित केली जाईल.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025: आता 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित केली जाईल.
वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष
नागपूर : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद नागपूर जिल्ह्यात उमटत आहेत. सध्या जल्लोषाचे वातावरण...
Read moreDetails






