वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक
जालना : शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर जोपर्यंत नम्रपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना परतुर-मंठा विधानसभा मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी दिला आहे. (Jalna)
सेवली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार लोणीकर यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक खटकळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Jalna)
या आंदोलनात जिल्हा सचिव गणेश खरात, दिलीप मगर, गौतम मगर, अनिल खाडे, लखन सदावर्ते, शहाजी खाडे, सुनील मगर, प्रसाद सदावर्ते, छत्रुघ्न कोळी, संतोष खाडे, करण डोके, संजय डोके, ईश्वर डोके, सुमित डोके, गौतम वाहूळे, लहूजी पहुरे, दत्ता खाडे, सिध्दार्थ प्रधान, आत्माराम सदावर्ते, संदीप केंद्रे, शरद काळे, रवींद्र मगर, शरद वाघमारे, सचिन वाघमारे यांच्यासह शेकडो शेतकरी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका घेण्यासाठी...
Read moreDetails