जालना : भाजप आमदार बबनराव लोणीकर पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करणाऱ्या तरुणांना लक्ष्य करत सडकून टिप्पणी केली आहे. यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याच दिसून येत आहे. (Babanrao Lonikar)
याबाबत विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका सोलर योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लोणीकर यांची जीभ घसरली. त्यांनी थेट तरुणांना उद्देशून म्हटले की, तुमच्या अंगावरील कपडे, पायातील चप्पल, हातातील मोबाईल आणि तुमच्या वडिलांना पेरणीसाठी मोदी सरकारने दिलेले ६ हजार रुपये, हे सर्व आमच्या सरकारमुळेच आहे.
तेसच, तुमच्या आईचा पगार, वडिलांचे पेन्शन आणि ‘लाडकी बहीण योजने’तून आई, बहीण आणि पत्नीच्या खात्यावर आलेले पैसे हे सर्व आमच्यामुळे आहे, असं लोणीकर म्हणाले. ‘आमचंच घेता आणि आमच्याच तंगड्या वर करता’ अशा तीव्र शब्दांत त्यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. (Babanrao Lonikar)
या विधानामुळे लोणीकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी लोणीकर यांच्या या वक्तव्याला ‘ब्रिटिशांची देशी आवृत्ती’ असे संबोधले आहे. लोकशाहीत अशी भाषा योग्य नाही, असे म्हणत विरोधकांनी लोणीकर यांना त्यांच्या आमदारकीची आठवण करून दिली. तुमचे कपडे, बूट, आमदारकी, गाडीतील डिझेल, विमानाचे तिकीट आणि विधानसभेतील स्थान हे सर्व जनतेमुळेच आहे, असे प्रत्युत्तर देत विरोधकांनी जनतेला आगामी निवडणुकीत हे बोल लक्षात ठेवण्याचे आवाहन केले आहे.
बांधकाम कामगार श्रमिक सेना ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये!
पुणे: बांधकाम कामगार आणि श्रमिकांना संघटित करणारी महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या बांधकाम कामगार श्रमिक सेना (महाराष्ट्र राज्य) या संघटनेने वंचित बहुजन...
Read moreDetails






