बार्शिटाकळी – मंगरूळपिर राज्य महामार्गावरील विद्रुपा नदीवर कान्हेरी सरप जवळील आणि शिवम जिनींग फॅक्ट्री जवळील पुलावर मागच्या वर्षीपासून कठडे नाहीत, तसेच त्याठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे सतत येथे अपघात होत असतात. त्याबाबतीत वारंवार संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन काहीच कारवाई झाली नाही.
याबाबत मुर्तिजापूर मतदार संघाचे आमदार हरीष पिंपळे यांना काहीच देणेघेणे नाही. ते बार्शिटाकळी तालुक्यात दिसतही नाहीत. त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्यावतीने दोन्ही अपघात स्थळांचे आमदार हरीष पिंपळे ऍक्सीडेंट स्पॉट असे फोटोसहीत बॅनर लावत नामकरण करुन निषेध नोंदवला.
फ्लेक्सवर १५ वर्ष आमदार कामगिरी एकदमच सुमार , असे सुविचार ही टाकण्यात आले..
यावेळी युवा तालुका अध्यक्ष अमोल जामनिक, जिल्हा सचिव श्रीकृष्ण देवकुणबी,तालुका संघटक हरीश रामचवरे, रोशन चोटमल, गणेश कवळकर, रक्षक जाधव, सनी धुरंदर, ऋषिकेश खंडारे, भूषण सरकटे, अमोल वकील जामनिक, रत्नपाल डोंगरे, रोशन इंगळे, शैलेश शिरसाट, प्रविण वानखडे उपस्थित होते.