मावळ : मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका यांच्यावतीने मावळ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मावळ तालुका कृषिप्रधान असून येथे इंद्रायणी तांदळासाठी प्रसिद्ध असलेली भाताची पिके घेतली जातात, मात्र पावसाच्या संततधारेमुळे अनेक शेतकऱ्यांचे पेरणीपूर्व मशागतीचे नियोजन कोलमडले, तर काहींच्या पेरलेल्या पिकांच्या रोपांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. वंचित बहुजन आघाडीने शासनाकडे मागणी केली की, मावळ तालुक्यात तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा.
यावेळी आणखी दोन मुद्दे उपस्थित करण्यात आले –
ग्रामपातळीवरील योजनांचा लाभ गरीब, गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे गावागावात योजना पोहोचवण्यासाठी प्रभावी नियोजन करावे.शाळांमध्ये कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत, त्यामुळे जात, उत्पन्न दाखल्यांसारखी कागदपत्रे त्वरित उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
यावेळी संतोष भाऊ लोखंडे (पू. जि. उपाध्यक्ष), राजूभाऊ गायकवाड (पू. जि. संघटक), नितीन ओव्हाळ (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका, संदीप कदम (अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी मावळ, मनीषा ओव्हाळ (अध्यक्ष, वंचित बहुजन महिला आघाडी मावळ), दत्ताभाऊ शिंदे, अनिल नाना गायकवाड, संजय भाऊ कुलकर्णी, किसन नाना गायकवाड, गौतम ओव्हाळ, बाळकृष्ण टपाले, लहू लोखंडे, सुनील वाघमारे, अक्षय साळवे, बब्रवान कांबळे, पवन उदागे, प्रमोद खंडारे, ज्योतीताई गायकवाड, आश्लेषा गायकवाड आदी उपस्थित होते. या निवेदनाद्वारे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून त्यांना तातडीने न्याय मिळावा, या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला आहे.