साकोली : स्त्री शिक्षणाच्या व महिला मुक्तीच्या उदगात्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन महिला आघाडी भंडारा जिल्हाध्यक्ष तनुजाताई नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली माता सावित्रीबाई फुले जयंती उत्सव अतिशय उत्साहात आणि थाटामाटा साजरा करण्यात आला.
स्त्री शिक्षण ही काळाची गरज असून महिलांनी आधुनिक सावित्री बनले पाहिजे, महिलांनी शोषणाविरुद्ध एल्गार पुकारले आवश्यक आहे. आजच्या घडीला स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, तरी सरकार ठोस पावले उचलत नसल्याचे तनुजा नागदेव यांनी म्हटले आहे.
या जयंती उत्सवात तनुजा नागदेवे तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हेमलतान बंधू , कुंदा भोवते, सेविका जांभुळकर, कोकिला रामटेके, उमेश्वरी मेश्राम, जोशना रंगारी, कांता शिंदे, तनुजा मार्तंड नागदेवे, वेज्ञा शेहारे, अरुणा बडोले, चंद्रकला जांभुळकर, अंतकला मेश्राम, ताराबाई राऊत, कांता गजभिये, जोशना खोब्रागडे, प्रेमचंद खोब्रागडे, नित्यानंद मेश्राम, यादोराव गणवीर, गणेश गजभिये, अमित नागदेवे, वैशाली गजभिये, प्रमिला घन यांच्यासह अन्य महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.