रशिया : सकाळी रशियामध्ये 8.8 तीव्रतेच्या भीषण भूकंपाने हाहाकार माजवला आहे. या शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने प्रशांत महासागरात मोठमोठ्या त्सुनामी लाटा उसळल्या असून, केवळ रशियाच नव्हे तर जपान आणि अमेरिकेलाही याचा मोठा फटका बसला आहे.
त्सुनामीचा वाढता धोका
रशियाच्या किनारपट्टीवर 15 फुटांपर्यंत उंच त्सुनामीच्या लाटा धडकल्या आहेत, तर जपानमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांनी किनाऱ्यांवर आदळण्यास सुरुवात केली आहे. जपानमध्ये अजूनही त्सुनामी येण्याची शक्यता असल्याने भीतीचे वातावरण आहे. या धोक्यामुळे, अणुबॉम्ब स्फोटाची भीती लक्षात घेऊन, जपानमधील फुकुशिमा अणुऊर्जा केंद्र तातडीने रिकामे करून बंद करण्यात आले आहे.
नागरिकांचे स्थलांतर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता
त्सुनामीच्या या धडकी भरवणाऱ्या लाटा आता समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्या आहेत. अनेक भागांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. जगातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक असलेला हा भूकंप बुधवारी पहाटे समुद्रात झाला, ज्यामुळे उत्तर पॅसिफिकमध्ये त्सुनामीचा धोका निर्माण झाला. दक्षिणेकडील अलास्का, हवाई आणि न्यूझीलंडमध्येही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
जपानमध्ये भीतीचे वातावरण
जपानमध्ये त्सुनामीचा धोका अधिक असल्याने तीन वेळा सायरन वाजवण्यात आले, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांनी उंच इमारतींवर आश्रय घेतला आहे. जपान हवामान संस्थेनुसार, 16 ठिकाणी 40 सेंटीमीटर (1.3 फूट) उंचीच्या त्सुनामी लाटा दिसल्या आहेत, ज्या होक्काइडोपासून टोकियोच्या ईशान्येकडे पॅसिफिक किनाऱ्यावर दक्षिणेकडे पुढे सरकत आहेत. त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर किनारपट्टीजवळील लोकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून काही हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आले आहेत.
पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे
या नैसर्गिक आपत्तीमुळे नेमके किती नुकसान झाले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, रशिया, जपान आणि अमेरिका या तीन देशांवर सध्या त्सुनामीचे मोठे संकट आहे. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली असून, सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. पुढील काही तास या तीनही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
धक्कादायक: मित्राच्या मोबाईल वापरावरून वाद, पुण्यात तरुणाची हत्या
पुणे : केवळ मित्राचा मोबाईल न विचारता वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून पुण्यात एका २५ वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात...
Read moreDetails