Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“जय श्रीराम”च्या नाऱ्यावरून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियाकडून मारहाण

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
September 28, 2023
in बातमी
0
“जय श्रीराम”च्या नाऱ्यावरून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियाकडून मारहाण
       

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत उदरनिर्वाहासाठी देशभरातून लोकं येत असतात. सर्वांना सामावून घेणाऱ्या मुंबईत काल एक धक्कादायक घटना मुंबईतील कांदिवली येथे रात्री घडली. सिध्दार्थ अंगुरे नावाच्या एका मराठी तरुणाला परप्रांतिय टोळक्यांनी बळजबरीने “जय श्रीराम” च्या घोषणा द्यायला लावल्या. त्याने नकार दिल्याने तरुणाला बेदम मारहाण केली. शिवीगाळ करत “जय श्रीराम बोल नही तो मारुंगा”, तु कटवा है क्या? असं म्हणत परप्रांतीय टोळीने या तरुणाला जबर मारहाण केली. तरुणाचा भाऊ आणि नातेवाईकमध्ये आल्यामुळे कसाबसा हा तरुण थोडक्यात बचावला आहे. त्याच्यावर मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली येथे उपचार सुरू आहे.

याप्रकरणी पीडित कुटुंबियांनी वंचित बहुजन आघाडीकडे मदतीसाठी धाव घेतली, असता वंचित बहुजन आघाडीकडून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी सुरज तिवारी, अरुण पांडे, पंडित, राजेश रिक्षावाला यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम 341, 504, 323, 506, 34 अन्वये कांदीवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पोलिसांशी बोलून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पीडित तरूण सिद्धार्थ अंगुरे यांच्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली येथे उपचार सुरू आहेत. लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं करणे, कट्टर धार्मिक बनवून तणाव निर्माण करणे अशा घटनांनी देश होरपळून निघत आहे. मुंबईसारख्या शहरात अशा घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.


       
Tags: MarathimumbaiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

उज्जैन प्रकरण; आपला समाज हा अमानवीय झाला आहे – अॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post

वंचित बहुजन आघाडीचे नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर!

Next Post
वंचित बहुजन आघाडीचे नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर!

वंचित बहुजन आघाडीचे नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ज्यांना प्रस्थापितांनी नाकारलं, त्यांना बाळासाहेबांनी सत्तेत बसवलं; अकोल्यात सुजात आंबेडकरांची गर्जना!
बातमी

ज्यांना प्रस्थापितांनी नाकारलं, त्यांना बाळासाहेबांनी सत्तेत बसवलं; अकोल्यात सुजात आंबेडकरांची गर्जना!

by mosami kewat
January 5, 2026
0

अकोला : अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपल्या झंझावाती भाषणाने प्रचारात मोठी चुरस...

Read moreDetails
अकोला मनपा निवडणूक: सुजात आंबेडकरांच्या सभेला शास्त्री नगरात जनसागर; ‘वंचित’च्या प्रचाराने राजकीय वातावरण तापले

अकोला मनपा निवडणूक: सुजात आंबेडकरांच्या सभेला शास्त्री नगरात जनसागर; ‘वंचित’च्या प्रचाराने राजकीय वातावरण तापले

January 5, 2026
साम्राज्यवादी अमेरिकेचा व्हेनेझुएला वर कब्जा !

साम्राज्यवादी अमेरिकेचा व्हेनेझुएला वर कब्जा !

January 5, 2026
मुंबई महानगरपालिका निवडणूक: विक्रोळीत आज ॲड. प्रकाश आंबेडकरांची डरकाळी; 'वंचित'ची जाहीर सभा

मुंबई महानगरपालिका निवडणूक: विक्रोळीत आज ॲड. प्रकाश आंबेडकरांची डरकाळी; ‘वंचित’ची जाहीर सभा

January 5, 2026
लातूर मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘अ’ मध्ये वंचितची ताकद, सुजात आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात

लातूर मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘अ’ मध्ये वंचितची ताकद, सुजात आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात

January 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home