मुंबई : २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून इथली विषमतावादी, विभाजनवादी व्यवस्था नाकारली होती. मनुस्मृती दहन दिनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 27 वर्षापासून राज्यभरात भारतीय स्त्री मुक्तीदिन परिषदेचे आयोजन केले जाते. मनुस्मृती ही हिंदू व भारतात आलेल्या इतर धर्मातही विषमतावादी आणि विभाजनवादी सामाजिक व्यवस्था निर्माण करते. असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले आहे.
संविधानाने संपूर्ण समतेची हमी दिली तरी आजही आपल्या देशातील राजकिय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था प्रचंड विषमतेची आहे. कायदा संविधानाचा परंतू व्यवस्था मनुस्मृतीची असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागपूर येथे स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे पत्रकार परिषद पार पडली.
यावेळी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती त्यांनी केली आहे.