ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी काल दि. 24 जून रोजी एबीपी माझा वहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यघटना, कायदे, आणि कोर्टाच्या निर्णयांच्या आधारावर खालील मुद्दे सांगितले.
1. विधानसभा अध्यक्ष नसतांना विधानसभा उपाध्यक्षास सर्व अधिकार असतात.
2. आमदारांनी वेगळा गट करून बंडखोरी केल्यास सरकार बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपालास नाही.
3. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या सह्या असलेले पत्र ग्राह्य धरण्याआधी सर्व बंडखोर आमदारांना व्यक्तिशः विधानसभा अध्यक्षांच्या समोर येऊन आपण स्वतः सही केल्याचे सांगावे लागेल. त्याशिवाय वेगळा गट म्हणून मान्यता मिळणार नाही.
4. उद्धव ठाकरेंनी स्वतःहून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न दिल्यास विधानसभेत विश्वासमत परिक्षा घ्यावीच लागेल त्यासाठी सर्व आमदारांना विधानसभेत व्यक्तिशः हजर रहावे लागेल.
ऍड.प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलेल्या वरील मुद्यांवरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यात उद्धव ठाकरे मजबूत स्थितीत असल्याचे स्पष्टपणे दिसते.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ऍड आंबेडकरांनी भाष्य केल्यानंतर महाराष्ट्र सरकारचा पवित्रा बदलल्याचे दिसून येत आहे. बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात येण्याशिवाय गत्यंतर नाही असे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना बंडखोरांविरुद्ध आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.