काँग्रेस आधीपासूनच भाजपची बी टीम असल्याची सर्वत्र चर्चा
भंडारा : महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेसोबत युती केली आहे.
शिवसेनेतील बंडानंतर गद्दार म्हणून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आमदारासोबत काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हातमिळवणी केल्याचं समोर आलं आहे.
राजकारणातील दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते राज्यातील राजकारणात नेहमी एकमेकांच्या विरोधात आहेत. त्या पक्षांच्या नेत्यांनी आज भंडारा येथे जिल्ह्यात दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकत्र हातमिळवणी केली.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दूध संघाच्या निवडणुकीत हातमिळवणी केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोलापूरमधील बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते आणि भाजप आमदार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं.
भंडाऱ्यातील (Bhandara) या युतीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अशाच आघाडी व युती पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
विशेषतः विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत देखील नाना पटोले यांची महाविकास आघाडीत देखील संशयास्पद भूमिका होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील झाली होती. आता दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेसोबत युती करणाऱ्या नाना पटोले यांच्यामुळे आता भाजपची खरी बी टीम काँग्रेसच असल्याचे आता बोलले जात असून, अशीच परिस्थिती युती आणि आघाडी करताना काँग्रेसकडून होत राहिली तर भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकच आहेत. त्यामुळे त्यांना जनता आगामी निवडणुकांमध्ये त्यांना जागा दाखवून देईल, असेही आता बोलले जात आहे.