Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

mosami kewat by mosami kewat
July 18, 2025
in बातमी
0
‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

       

‎
पुणे : राज्य सरकारने प्रशासकीय यंत्रणेत मोठे फेरबदल करत २० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुरू असलेल्या या बदली सत्राचा हा आणखी एक टप्पा आहे. या फेरबदलांमध्ये अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली असून, पुण्याला दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत.
‎
‎यात एम.एम.सूर्यवंशी यांना वसई-विरार महानगरपालिका वसई येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून, तर दीपा मुधोळ-मुंडे यांना पुण्यात समाज कल्याण आयुक्त म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
‎
‎१) एम.एम.सूर्यवंशी (आयएएस:एससीएस: 2010) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई येथून वसई-विरार महानगरपालिका वसई येथे महानगरपालिका आयुक्त पदावर बदली करण्यात आली.
‎
‎२) दीपा मुधोळ-मुंडे (आयएएस:आरआर: 2011) यांची अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणे येथून पुण्यात समाज कल्याण आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली.
‎
‎३) नीलेश गटणे (आयएएस:एससीएस: 2012) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे येथून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई येथे बदली करण्यात.
‎
‎४) ज्ञानेश्वर खिलारी (आयएएस:एससीएस:2013) यांची संचालक, ओबीसी, बहुजन कल्याण, पुणे येथून अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे या पदावर नेमणूक करण्यात आली.
‎
‎५) अनिलकुमार पवार (आयएएस:एससीएस:2014) यांची महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, वसई येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, MMRSRA ठाणे येथे बदली करण्यात आली.
‎
‎६) सतीशकुमार खडके (आयएएस:एससीएस:2014) यांना संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय मुंबई येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे येथे नियुक्त करण्यात आले आहे.
‎
‎७) भालचंद्र चव्हाण (आयएएस: नॉन एससीएस: 2019) यांची आयुक्त, भू-सर्वेक्षण विकास संस्था, पुणे येथून संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नेमणूक करण्यात आली आहे.
‎
‎८) सिद्धार्थ शुक्ला (आयएएस:आरआर:2023) यांच्या दिनांक 02.07.2025 च्या आदेशात बदल करुन सहाय्यक जिल्हाधिकारी, गोडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी म्हणून ITDP, धारणी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी उपविभाग, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
‎
‎९) विजयसिंह शंकरराव देशमुख (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर पदोन्नती) यांची अतिरिक्त आयुक्त-२, छत्रपती संभाजीनगर विभाग येथून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
‎
‎१०) विजय सहदेवराव भाकरे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती) यांची अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, भंडारा येथून सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
‎
‎११) त्रिगुण शामराव कुलकर्णी (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर पदोन्नती) यांची अतिरिक्त महासंचालक, MEDA, पुणे येथून यशदा, पुणे येथे उपमहासंचालक पदावर बदली करण्यात आली.
‎
‎१२) गजानन धोंडीराम पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
‎
‎१३) पंकज संतोष देवरे (अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस) यांची अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, लातूर येथून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणे येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर बदली करण्यात आली.
‎
‎१४) महेश भास्करराव पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस म्हणून पदोन्नती) यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल) पुणे विभाग येथून आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे इथं आयुक्त पदावर नेमणूक करण्यात आली.
‎
‎१५) मंजिरी मधुसूदन मानोलकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी, IAS म्हणून पदोन्नती) यांची सहआयुक्त, (पुनर्वसन), नाशिक विभाग, नाशिक येथून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
‎
‎१६) आशा अफझल खान पठाण (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती) यांची सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर येथून सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर या पदावर बदली करण्यात आली आहे.
‎
‎१७) राजलक्ष्मी सफिक शाह (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर पदोन्नती) यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त (जनरल), कोकण विभाग, मुंबई येथून व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

‎
‎१८) सोनाली नीलकंठच मुळे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती) यांची अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, अमरावती येथून संचालक, OBC, बहुजन कल्याण, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
‎
‎१९) गजेंद्र चिमंतराव बावणे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती) यांची अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, बुलढाणा येथून आयुक्त, भू सर्वेक्षण विकास संस्था, पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे.
‎
‎२०) प्रतिभा समाधान इंगळे (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती) यांची अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, सांगली येथून आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली.
‎
‎
‎


       
Tags: IASMaharashtra IAS transfersofficerspune
Previous Post

१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बाळाला दत्तक घेतल्याने खळबळ, ७ जणांवर गुन्हा दाखल ‎

Next Post

‎चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

Next Post
कांदिवली, चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

‎चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत - ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका
बातमी

‎विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका

by mosami kewat
August 7, 2025
0

‎शरद पवार तर भाजपचे हस्तकच - ॲड. प्रकाश आंबेडकर‎‎मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान...

Read moreDetails
ॲड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर कोर्टात हजर, वकिलांशी साधला संवाद

ॲड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर कोर्टात हजर, वकिलांशी साधला संवाद

August 7, 2025
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; मुंबई येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; मुंबई येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

August 7, 2025
पुणे विमानतळावर 6 कोटींचा गांजा जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक

पुणे विमानतळावर 6 कोटींचा गांजा जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक

August 7, 2025
Pune Monsoon: पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात; अनेक भागांत पाणी साचले!

Pune Monsoon: पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात; अनेक भागांत पाणी साचले!

August 7, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home